तीर्थक्षेत्र येलवाडी गावच्या उपसरपंचपदी विक्रम बोत्रे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

तीर्थक्षेत्र येलवाडी गावच्या उपसरपंचपदी विक्रम बोत्रे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
तीर्थक्षेत्र येलवाडी गावच्या उपसरपंचपदी विक्रम बोत्रे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
  • प्रतिनिधी -: खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विक्रम बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.काही दिवसांपूर्वी येलवाडी गावातील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक बिनविरोध झाली होती.यामध्ये सरपंचाची थेट जनतेतून निवड झाल्यानंतर उपसरपंच निवड ही सदस्यांन मधून झाली.या सर्वांनी एकमताने विक्रम बोत्रे यांची गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड केली.या अगोदर च्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा विक्रम बोत्रे यांनी उपसरपंच पदाची धुरा सांभाळली होती.पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाडामालक अशी ओळख असलेले विक्रम बोत्रे हे गावच्या विकासकामा मध्ये सतत अग्रेसर असल्यामुळे त्यांची एकमताने दुसऱ्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेमध्ये गावातील सरपंच रणजित गाडे यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित येलवाडी गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विक्रम बोत्रे यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.