"सुरत-चेन्नई कॉरिडॉर हा राष्ट्रीय महामार्ग" जाणार बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून.

"सुरत-चेन्नई कॉरिडॉर हा राष्ट्रीय महामार्ग" जाणार बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून.

बि पि एस राष्ट्रीय न्यूज सोलापुर 

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.      सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग अखेर अंतिम झाला असून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास जमीन संपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट वरुन जाणाऱ्या या चार तालुक्यातील 61 गावातून 151 किलोमीटरचा महामार्ग जात आहे. ग्रीन कॉरिडोर बरोबरच सोलापूर शहरासाठी अनेक वर्षापासून मागणी असलेला महामार्ग मंजूर झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गाला उद्योग व व्यापार वाढीसाठी खूप मोठी मदत होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे आणि सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

सुरत-चेन्नई महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून परंडा तालुक्यात येईल आणि परंडा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येईल. परत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर वरून अक्कलकोट तालुक्यातून कर्नाटक राज्याला जोडला जाईल. परंडा तालुक्यातील 12 तर तुळजापूर तालुक्यातील 18 गावातून हा राष्ट्रीय महामार्ग जाण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे ते सोलापूर महामार्गावरील केगाव ते हत्तुर असा 22 किलोमीटरचा बाह्यवळण मार्ग तयार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात हत्तुर ते तांदुळवाडी 25 किलोमीटरचा तर तिसऱ्या टप्प्यात तांदुळवाडी ते केगाव 25 किलोमीटरचा असणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर साठी येणाऱ्या गावातील जमिनी बाबत येत्या आठवड्यात गॅझेट प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तीन याची सूचना प्रसिद्धी करण्यात येणार आहे. गट क्रमांक निश्चित झाल्यावर संयुक्त मोजणी होईल त्यानंतर अंतिम टप्प्यात म्हणून अंतिम जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे.

अरुणा गायकवाड- भूसंपादन अधिकारी