केळवद पोलीस च्या सतर्कतेमुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त .

केळवद पोलीस च्या सतर्कतेमुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा  जप्त .

केळवद पोलीस च्या सतर्कतेमुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त .

Delhi91bpslive news network 

सावनेर :(21 मार्च)  केळवद पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित सुगंधित गुटखासह दोन आरोपींना अटक करण्यात आले . दिनांक-20/03/2024 रोजी पोलीस स्टेशन केळवद हद्दतीत पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा - खुर्सापार चेकपोस्ट , (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 येथे नाकाबंदी करीत असताना दिनांक-20/03/2024 ला दुपारी 1:00 वाजताच्या दरम्यान MT RAI ट्रॅव्हल्स क्र MH-14 CW-4647 ही येताना दिसली सदर ट्रॅव्हल्स नाकाबंदीचे ठिकाणी थांबवुन ट्रॅव्हल्सच्या डिक्कीची पाहणी केली असता ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू आढळून आले. प्रतिबंधित तंबाखूची किंमत- 1,00,400/- रुपये असून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आले व सदर माल कोणाचा आहे याची चौकशी केली असता ट्रॅव्हल्स मधील प्रवासी नामे- (1) कमल हसम छवारे वय-42 वर्ष रा- इंदिरा नगर , नगरधन तह- रामटेक जि- नागपुर,( 2) इमरान मजिद शेख वय-28 वर्ष रा- महात्मा गांधी रोड, गांधी वार्ड, भंडारा यांचा माल असल्याचे निश्पन्न झाल्याने . या प्रकरणी दोघांवर भादंवि कलम 328 , 272 , 273 , 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले .

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (नागपूर ग्रामीण) यांचा मार्गदर्शनात सावनेर तहसील अंतर्गत येणाऱ्या केळवद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल धोंडूत्या देवकाते , हेड कॉन्सटेबल दिनेश काकडे , दीपक इंगळे , गुनेश्वर डाखोले यांनी केले .