सुभाष हिंदी प्राथमिक शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
सुभाष हिंदी प्राथमिक शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
(Bps.live.news.network)
सावनेर : सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले.
दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असून सावनेर शहरातील विविध शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संस्थां द्वारे ही जयंती साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने सावनेर नगर परिषद अंतर्गत येणारी सुभाष हिंदी प्राथमिक शाळा येथे विविध उपक्रमांतून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले असून बालिका दिवस ही साजरी करण्यात आली .
यानिमित्त सावनेर शहर स्थित सुभाष हिंदी प्राथमिक शाळा मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याधिपिका फरीदा अतीक सय्यद होती . तर व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष मनीषा कमाले उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रेला माल्यार्पण करून करण्यात आली.
मुख्याध्यापिका फरीदा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका फरीदा सय्यद म्हणाले की, काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य असतात. परंतु टोचणाऱ्या काट्यांची जाणीव होऊन आपला हक्क मिळविण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य असतात. भारत देशातील पुरूषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीला ज्ञानामृताचा आनंद देणाऱ्या तसेच प्रत्येक स्त्रीचे जीवन फुलविणाऱ्या सावित्रीबाई फुले अशाच एक असामान्य व्यक्ती होत्या . असे म्हणून मुख्याध्यापिका यांनी शाळेतील सर्व विद्यार्थांना संबोधित करून कार्यक्रमाची शोभा वाढविले . तसेच कार्यक्रमात उपस्थित असणारे विद्यार्थ्यांचे आई व शाळेतील शिक्षिका यांनी संगीत कुर्सी स्पर्धा व नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले . सदर कार्यक्रमात उपस्थित असणारे विद्यार्थ्यांचे मातोश्री (आई) यांना भेंट वस्तू देऊन सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया भगत हिने केले तर आभार प्रदर्शन हर्षिता कुशवाह ह्या विद्यार्थिनीने केले .