प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन. सावली दिव्यांग संघटनेची मागणी

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन.  सावली दिव्यांग संघटनेची मागणी

शेवगाव :-दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार घरे वाटप करताना दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण ठेवण्याबाबत चा नियम असताना शेवगाव तालुक्यातील मंजूर असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पैकी दिव्यांग लाभार्थ्यांना वंचित ठरवल्याचे प्रकार लक्षात आले असून अनेक दिव्यांगांना संघटनेकडे याबाबत खंत व्यक्त केली आहे. दिव्यांगांना हक्काचे आरक्षणानुसार घरकुल मिळावे अन्यथा जिल्हाधिकार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा सावली दिव्यांग संघटनेचे चाँद शेख यांनी दिला आहे.

याबाबत हकीगत अशी आहे की शेवगाव तालुक्यातील बेघरांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मिळण्याकरता पात्र-अपात्र याचा सर्वेनुसार पात्र लाभार्थी यांना घरकुल देण्यासाठी इष्टांक प्रमाणे पात्र लाभार्थ्यांना पैकी दिव्यांग असलेल्या व्यक्तीस दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा 2016 नुसार पाच टक्के नुसार दिव्यांगांना प्राधान्य देऊन घरकुल मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मागणीनुसार गट विकास अधिकारी यांच्याकडून नियमानुसार उचित कार्यवाही करण्याबाबत शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तसेच विस्ताराधिकारी यांच्याकडून सूचना करण्यात आल्यानंतर अनेक ग्रामसेवक दिव्यांगांना प्राधान्य दिले तर काही ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केले ज्या दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले नाही त्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे घरकुल प्रस्ताव पाठवून घरकुल मिळण्यासाठी लेखी विनंती अर्ज देखील केले आहेत शेवगाव तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांवर घरकुल मंजुरीचे प्रस्ताव पाठवताना अन्याय झाला असून दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येत नसल्याच्या लेखी तोंडी तक्रारी संघटनेकडून प्राप्त झाल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजने दिव्यांगांना प्राधान्य न दिल्यास बुधवार दिनांक 29 सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्याचा इशारा चांद शेख संभाजी गुंठे नवनाथ आवटी मनोहर मराठे खलील शेख अनिल विघ्ने शिवाजी आहेर बाबासाहेब गडाख गणेश महाजन सुनील वाळके गणेश प्रमाणके बाहुबली वायकर अरुण गवळी निर्मला भालेकर सोनाली चेडे संजीवनी आदमाने चंद्रकला चव्हाण निलोफर शेख यांनी दिला आहे.

दिव्यांग आवर झालेला अन्याय दूर करून मागणी मान्य करून दिव्यांग आवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये आंदोलन करण्याची वेळ आल्यास सर्वस्व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.

अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव चांद कादर शेख.