श्री येलेश्वर विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.येलवाडी वर एकहाती सत्ता
प्रतिनिधी पुणे दि २६ - श्री येलेश्वर विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.येलवाडी २०२२ ते २०२७ ची मतदान नुकतीच प्रक्रिया पार पडली.या प्रक्रियेत संत भागीरथी माता शेतकरी विकास पॅनल आणि संत भागीरथी माता सहकार पॅनल असे दोन पॅनल मिळून २४ उमेदवार रिंगणात उभे होते.यात संत भागीरथी माता शेतकरी विकास पॅनल चे पूर्णपणे १२ उमेदवार निवडून आले आहेत. यामधे सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मध्ये संतोष दत्तात्रय बोत्रे, शांताराम महादू सातव,राजू नामदेव बोत्रे,सुरेश दिगंबर मोरे,शंकर लक्ष्मण गाडे,रामचंद्र पंढरीनाथ गाडे,वसंत भिकाजी गाडे,अजित शांताराम बोत्रे व अनुसूचित जाती जमाती मध्ये पोपट लिंबाजी गायकवाड तसेच महिला प्रतिनिधी मध्ये दिपाली वसंत गाडे व वर्षा बाळासो गाडे आणि इतर मागास वर्गिय प्रतिनिधी मध्ये रंजित विठ्ठल गाडे हे भरगोस मतांनी विजयी झाले आहे.