सुतार समाजाच्या वतीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन .

सुतार समाजाच्या वतीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन .

सुतार समाजाच्या वतीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन .                                                                                  BPS Live news nagapur                                          नागपूर :- अखिल सुतार समाजातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समाजाच्या वतीने दि.26 फेब्रुवारीला निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 लाखाच्या दरम्यान सुतार समाज हा विखुरलेला आहे व दररोज काम करून म्हणजेच हातावरचा गरीब समाज आहे.परंतु मुलांना शिक्षण घेण्यासाठी काहीच सवलत नाही,घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही यामुळे मुले हे वाम मार्गाला लागत आहे.तसेच घरकुल योजनेची स्पेशल कोट्यातून या समाजासाठी तरतूद करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समाज बांधवांनी निवेदन दिले.यावेळी सुतार समाजातील समाजसेवक श्री.गजाननराव तांदूळकर (तालुकाप्रमुख कळमेश्वर व सावनेर -मानव अधिकार सुरक्षा संघटना,श्री.रविंद्रजी खेडकर अध्यक्ष मानव अधिकार सुरक्षा संघटन नागपूर जिल्हा तसेच श्री.राजूभाऊ नानवटकर ग्रामीण अध्यक्ष व सर्व सुतार समाज बांधव हजार होते.