विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

बोधेगाव:- दिवटे-बोधेगाव रस्त्यालगत असलेल्या गावठाण डीपी शेजारुन जात असताना अचानक विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्याने शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील शिवाजी शंकर कणसे (वय वर्षे 25) या युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी ६ दरम्यान घडली.
घरचे काम आणि शेताचा भार यामुळे शिवाजी कणसे यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी बोधेगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर चे काम सोडले. शेतातील कामे सुरू असताना गेल्या आठवड्यापासून दिवट्या आणि परिसरामध्ये सुरू असलेला संतधार पाऊस संध्याकाळच्या दरम्यान काहीसा बंद झाल्याने शेतातील पिकाची परिस्थिती पाहण्यासाठी तो सायंकाळी सहाच्या दरम्यान गावालगत असलेल्या डीपी पासून जात होता. परंतु ओलसर जमीन मध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने तो चिकटून मरण पावला यादरम्यान सोबत असलेल्या मित्राचे डीपी पोल वरील पार्किंगचे दृश्य लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ बोधेगाव सब स्टेशनला फोन करून माहिती दिली यावेळी लाईट बंद करण्यात आल्यानंतर त्याला प्रथम बोधेगाव नंतर शेवगाव येथील डॉक्टर विकास बेडके यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तपासणी अंति मात्र त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी दोन वर्षाची मुलगी आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा असल्याने परिसरामधून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जमीन ओलसर झाल्या आहेत त्यामुळे विद्युत ग्राहकांनी विद्युत ट्रान्सफॉर्मर लाईट पोल जवळून जाताना दक्षता घ्यावी तसेच विद्युतची कामे करताना सावधानता बाळगावी.
पंकज मेहता-सहाय्यक अभियंता बोधेगाव सब स्टेशन