शेवगावात बनावट अपंग प्रमाणपत्राचा पर्दाफाश . - दोघांना अटक .बनावट शिक्के .ओळखपत्रही जप्त .
अंध अपंगाचे बनावट प्रमाणपत्र पैसे घेऊन बनवून देणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी रंगेहात पकडून बनावट अपंग प्रमाणपत्रचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात दोघां जनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . ही कारवाई शेवगाव पोलिसांनी सोमवार दि .21 रोजी दुपारी2: ३० वाजता सुमारास करून दि .22रोजी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शेवगाव तालुक्यातील बनावट प्रमाणपत्राचा पर्दाफाश झाला असून आरोपींनी कोणाकोणाला बनावट प्रमाणपत्र दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. बनावट प्रमाणपत्र बनवून घेणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत .
समजलेली माहिती अशी शेवगाव- दादेगाव रोडच्या बाजूला टाटा इंडिको( क्र . एम एच 17. ऐ जे8935) कार मध्ये एक व्यक्ती पैसे घेऊन अपंगाचे बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती शेवगाव पोलीस ठाण्याचे पो.नी . प्रभाकर पाटील . यांना गुप्त बातमीदार मार्फत समजली. या माहितीची खातरजमा करून .पाटील यांनी पो. हे . कॉ . नाकाडे . विर .बाबासाहेब शेळके . पो . कॉ . शिरसाट .धाकतोडे यांनी सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले .पथकाने दोन पंचांसमक्ष सदरील ठिकाणी छापा टाकला असता.दादेगाव रोडच्या बाजूला इंडिगो कार मध्ये बसून संजय स्वरूप राजे भोसले (वय 62 रा औदुंबर बंगला लांडे वस्ती शेवगाव) हा महाराष्ट्र शासन नाव असलेले ओळखपत्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र असे नाव असलेला गोल शिक्का त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले कागदपत्र आढळून आले. आरोपी संजय स्वरूप राजे भोसले हा परमेश्वर भगवान बडे (रा. सामनगाव हल्ली रा. मगर वस्ती शेवगाव) यांच्या राहते घरी संगनमताने बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी बडे यांच्या घरी छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचे शिक्के असलेली कागदपत्रे कोरे ओळखपत्रे अपंगा साठी लागणारे कोरे प्रमाणपत्र आढळून आले. आरोपीकडे आढळलेल्या कागदपत्रांमध्ये धुळे .बीड. बुलढाणा.अहमदनगर. जिल्हा समाज कल्याण अधिकारी .राज्य परिवहन आगार व्यवस्थापक. यांच्या नावाचे शिक्के मारलेले कागदपत्रे कोरे ओळखपत्र असे आढळून आले. तसेच ढोरजळगाव. लाडजळगाव. शास्त्रीनगर (शेवगाव )चर्हाट( ता पाटोदा) असे सिक्के मारलेले कोरे कागदपत्र आढळून आले आहेत. शेवगाव पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इंडिगो कार कागदपत्रे कोरे ओळखपत्र अपंगासाठी सवलती च्या प्रवासा साठी लागणारे ओळखपत्र जप्त केली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात पु .ना .संतोष चंद्रकांत काकडे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय सुरूप राजे भोसल व परमेश्वर भगवान बडे या दोघावर सरकारी व निमसरकारी कार्यालयाची शिक्के असलेली कागदपत्रे जवळ बाळगून जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.