*महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटीकेला दुसऱ्यांदा थ्री स्टार मानंकन जाहीर.*
*महात्मा फुले कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटीकेला दुसर्यांदा थ्री स्टार मानांकन जाहिर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 24 ऑगस्ट, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटीकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे दुसर्यांदा सर्वोच्च थ्री स्टार (सर्वोत्तम) दर्जा प्राप्त झाला आहे. ही रोपवाटीका विद्यापीठाच्या स्थापनेपासुनच दर्जेदार, जातीवंत, किडरोगमुक्त कलमे/रोपे निर्मितीसाठी ओळखली जाते. उद्यानविद्या विभागाच्या या रोपवाटीकेत दरवर्षी डाळिंब, आंबा, कागदी लिंबु, चिकू, सिताफळ, जांभुळ, पेरु इ. फळझाडांची विविध वाणांची निरोगी/दर्जेदार 10 लाखांच्या वर रोपांची निर्मिती करुन ती शेतकर्यांना वितरीत केली जातात. या रोपवाटीकेत तयार झालेल्या कलमे/रोपांना शेतकर्यांकडून प्रथम पसंती असते. म्हणुनच शेतकर्यांना जातीवंत कलमे/रोपे पुरवठा करण्यामध्ये उद्यानविद्या रोपवाटीकेचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. जुलै-2026 मध्ये गुरुग्राम (हरियाणा) येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्या चमुने मानांकनासाठी रोपवाटीकेची तपासणी केली. यावेळी या रोपवाटीकेत निर्माण केले जाणारे विविध फळझाडांच्या कलमे रोपांच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रोपवाटीकेच्या मानांकनासाठी शिफारस केली. त्यानुसार भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाकडून या रोपवाटीकेला सर्वोच्च थ्री स्टार दर्जा प्राप्त झाल्याचे प्रत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांचे रोपवाटीकेला मानांकन मिळण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. रोपवाटीकेला मानांकन मिळण्यासाठी उद्यानविद्या प्रक्षेत्राचे अधिकारी डॉ. सचिन मगर तसेच रोपवाटीकेचे प्रभारी विजय पवार, राहुल पाटील व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








