*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ*

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ*                                                                            बी .पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क.                            कामठी:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७ साजरा करण्यासाठी आयोजित ऊर्जा महोत्सवाचा कामठी तालुक्यातील वडोदा येथे आयोजित शानदार समारंभात शुभारंभ करण्यात आला. आझादी का अमृत महोत्सव पॉवर @२०४७ केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशातील सर्व जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यानुसार महावितरणच्या वतीने

राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी लाभलेल्या कामठी तालुक्यातील वडोदा येथे ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. टेकचंद सावरकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आर.विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे

मुख्य अभियंता दिलीप दोडके,महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे, उपजिल्हाधिकारी व नोडल अधिकारी शिवराज पडोळे, सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटयूटचे सहसंचालक राजेश रंजन,जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख,जिल्हा परिषद सदस्या अवंतिका लेकुरवाळे,पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, वडोदाच्या सरपंच सौ. वनिता इंगोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते महावितरणने कोरोना काळात उत्कृष्ट काम केले असा गौरव करून समाजाकडून आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण समाजाला काय देतो याचे आत्मपरीक्षण या महोत्सवाच्या निमित्ताने करण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी व्यक्त केले.महावितरणचे वीज बिल नियमित भरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ऊर्जा विभाच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात विकासाची ऊर्जा निर्माण झाली असून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रशासनाने अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असे आवाहन आ.टेकचंद सावरकर यांनी या प्रसंगी केले. तर देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महावितरणचे वीज बिल नियमित भरणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे,त्यामुळे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याची विनंती प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केली. कार्यक्रमात स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या वडोदा येथील भैय्याजी खराबे यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात आली. या प्रसंगी महावितरणच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या दिलीप ढोबळे,संभाजी गावंडे व ज्ञानेश्वर आखरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरिष गजबे, अजय खोब्रागडे,अमित परांजपे,वाय.डी.मेश्राम,कार्यकारी अभियंते समीर शेंदरे, राजेंद्र गिरी,हेमराज ढोके,राजेश घाटोळे,दीपक अघाव,राहुल जीवतोडे,समीर टेकाडे,दिपाली माडेलवार यांच्यासह अभियंते,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी एलइडी लाईटचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती राजेश रंजन यांनी प्रास्ताविकेतून दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित पेडेकर व मेघा अमृते यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी सरकारच्या उत्कृष्ट कामांची माहिती पोस्टर्स व चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शनीद्वारे देण्यात आली. कार्यक्रमात रंगधून कलामंचच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महावितरणचे अधीक्षक अभियंता व कार्यक्रमाचे नोडल अधिकारी अविनाश सहारे व कार्यकारी अभियंता रुपेश टेम्भूर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कीर्ती चांभारे, उपकार्यकारी अभियंता वैद्य, तेजे ,राठोड,भगत तसेच सर्व शाखा अभियंता यांनी सहकार्य केले.