मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या मानवता हाच खरा धर्म*

मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या मानवता हाच खरा धर्म*

*मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या मानवता हाच खरा धर्म*                                                                     बी .पी .एस लाईव्ह न्युज.                                                सावनेर :-हृदय हेलावून टाकणारी घटना..... अपत्यासाठी प्रत्येक मायबाप आयुष्यभर कष्ट उपसतात. स्वतः एक वेळ उपाशी राहून मुला-मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात, स्वतःच्या वाटेला आलेल्या गरिबीची झळ मात्र आपल्या लाडक्यांना बसू देत नाही. मात्र वृद्धपकाळी त्याच मायबापांच्या वाटेला वेदना आणि यातना, याशिवाय काहीच येत नाही... विशेष म्हणजे, त्यांना वेदना देणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांची स्वतःची अपत्य असतात. काही मुले-मुली तर इतकी निर्लज्ज असतात की स्वतःच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याचीही त्यांना लाज वाटते. असाच

काहीसा प्रकार नागपूर येथील वेणूबाई फुलझले वय 75 या वृद्ध महिलेच्या नशिबी आला. त्यांना स्वतःची मुलगी असूनही कोणीही त्यांच्या अंत्यसंस्काराला आले नाही, शेवटी सावनेर तालुक्यातील हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश दादा बनसोड यांनी माणुसकी जपत वेणूबाई फुलझले, हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. "आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते घर माझे शोधाया, मी वाड्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते.... असाच काही प्रकार वेणूबाई यांच्याबाबतही घडला. मृतक वेनुबाई हे गेल्या अनेक वर्षापासून सावनेर येथील वृद्धाश्रमात राहत होत्या, वेणू बाई हिची तब्येत खराब असल्याने तिला हितेश बनसोड यांनी मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मेडिकल हॉस्पिटल वाल्याने चेकअप करून तिला घेऊन जाण्यास सांगितले, आजीचे दिवस कमी असल्याने हितेश यांना तिच्या भाची बद्दल माहिती झाली, तीला हितेश यांनी अत्यविधीसाठी बोलावून घेतले, आश्रम मधील लोकांनी मुलीला बरेचदा संपर्क करूनही काहीच प्रतिसाद येत नव्हता, इकडे मृत्यूशी झुंज सुरू होती, तरीही मुलीला पाझर फुटला नाही, मुलगी इतक्या कठोर असू शकतात हे तेव्हा कळले, अखेर त्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या पार्थिवावर हितज्योती आधार फाउंडेशननेच अंत्यसंस्कार केले, अंतदर्शनासाठीही मुलगी आली नाही, वेनूबाई हिने अखेरचा श्वास घेताना झालेला त्रास आणि मृत्यूनंतर झालेली हेळसांड बघून, हितज्योतीचा सर्वाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली.... यावेळी तिची भाची रूपाली देशमुख, अभिषेक भगत, तुषार महल्ले, आश्रममधिल पदाधिकारी,आजीबाई सोबत यांचं कुठल नातं नसतानाही पोलीस निरीक्षक मारुती मुळक, आदी उपस्थित होते.. "मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या " मानवता हाच खरा धर्म या पोस्ट बद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा... आणि जमल्यास ही पोस्ट नक्की शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा याची प्रेरणा मिळेल हितज्योती आधार फाउंडेशन सावनेर जिल्हा नागपूर (महाराष्ट्र) ७८८८१६१६३३/७०८३४१५४२ ही संस्था रोडवरील बेघर,बेवारस, अनाथ, अपंग, मनोरुग्ण अपघातग्रस्त ,लोकांसाठी कार्य करते