पर्जन्यमापकावर पावसाची चुकीची नोंद. शासनाच्या स्कायमेट वर 31.3 मी .मी. तर कृषी विभागाकडे 97 मीमी पावसाची नोंद
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मात्र शासनाकडून ग्राह्य धरण्यात येत असलेल्या स्कायमेट या संस्थेच्या पर्जन्यमापकावर गुरुवारी (दि8) झालेल्या पावसाची नोंद 31.3 मिलिमीटर आहे. तर महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर हीच नोंद 97 मिलिमीटर आहे. ( दि .९) झालेल्या पावसाच्या नोंदीतही दोन्ही ठिकाणी तब्बल 14 मिलिमीटर चा फरक दिसत आहे. शासनाकडून स्कायमेट ची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येत असल्याने त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
ढोरजळगाव परिसरात गुरुवारी ( दि .८) पावसाने पहाटेपासून सुमारे पाच तास जोरदार हजेरी लावली या पावसामुळे शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते ढोरा नदीला पूर आला होता अनेक ठिकाणी कपाशी तूर उसाच्या पीकात पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले होते त्यामुळे कपाशी तूर मूग अशी हातात तोंडाशी आलेली पिके वायाला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे शेवगाव तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले आणि मंडळ कृषी अधिकारी कानिफ मरकड यांनी परिसरातील गावांना भेटी देऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी ग्रामस्थांशी बोलताना टकले म्हणाले की कायमेट या संस्थेने बसवलेल्या पर्जन्यमापका नुसार 31.3 मिलिमीटर पावसाची नोंद ढोरजळगाव मंडळात झाली आहे हीच आकडेवारी शासन दरबारी ग्राही धरली जाते प्रत्यक्षात ढोरजळगाव येथे बसवलेल्या महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर तब्बल97 मिलिमीटर पाऊस झाल्याचे दिसत आहे शासनाच्या दोन विभागाच्या पर्जन्यमापकात सुमारे 60 मिलिमीटर ची तफावत आढळली शेतकऱ्यांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी स्कायमेटच्या गरड वाडी येथील पर्जन्यमापकाची पाहणी केली हे यंत्र वेड्या बाभळींनी झाकून गेले होते त्याची वायर खराब झाल्याचे आढळून आले. दुसऱ्या दिवशी दिनो रोजी झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये सुद्धा 19.3 आणि 33 असा 14 मिलिमीटर चा फरक आढळून आला प्रत्यक्ष ढगफुटी सदृश्य पाऊस होऊनही शासनाने बसवलेल्या दोन स्वतंत्र पर्जन्यमापकात एवढी तफावत आढळते यामागे काही गोड बंगाल आहे का अशी शंका निर्माण झाली आहे कारण कृषी आणि महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार त्या मंडळाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसानीची पातळी निश्चित केली जाते नुकसान झाल्यानंतर संबंधित कंपनीला तातडीने टोल फ्री नंबर वर कॉल करून त्यांचे प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करतात परंतु पावसाची आकडेवारी ही शासनाने नेमून दिलेल्या संस्थेची ग्राह्य धरण्यात येते त्यामुळे नुकसान होऊनही व हजारो रुपयाचा पिक विमा भरूनही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत
मागील वर्षी महसूल विभागाच्या चुकीमुळे ढोरजळगाव मंडळातील शेतकऱ्यांचे पीक विम्याची सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपये पाण्यात गेले त्यामुळे झालेल्या पावसाची वस्तुस्थिती नोंद होणे गरजेचे आहे त्याप्रसंगी सरपंच सुधाकर लांडे राजेंद्र देशमुख भीमशक्तीदार कृषी अधिकारी पर्यवेक्षक सुनील गोडसे कृषी सहाय्यक रवींद्र ढाकणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
पावसाची नोंद ही शासनाने नेमून दिलेल्या स्कायमेटच्या पर्जन्यमापकानुसार ग्राह्य धरण्यात येते दोन्ही पर्जन्यमापका तफावत आढळली शासन स्तरावर याची माहिती कळवली जाईल. (अंकुश टकले तालुका कृषी अधिकारी)
शासनाच्या दोन विभागाच्या पर्जन्यमापकावर वेगवेगळी नोंद होऊन मोठी तफावत आढळते परंतु ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ नये स्कायमेटची कमी नोंद ग्राह्य धरली जाते विमा कंपनी व या संस्थेत मिली बघत असल्याची शंका येते . तसेच चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना मात्र फटका. (राजेंद्र देशमुख शेतकरी ढोरजळगाव.)