नाथ प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - डीवायएसपी जयदत्त भवर

नाथ प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - डीवायएसपी जयदत्त भवर

नाथ प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद डीवायएसपी जयदत्त भवर 

 

 

राहुरी शहरातील नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन श्रीरामपूरचे विभागीय उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते करण्यात आले.भवर यांनी नाथ प्रतिष्ठान तसेच सौरभ उंडे यांचे कौतुक करत,सामाजिक,धार्मिक, संस्कृतीक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.आकार्यक्रमासाठी सोहम प्राजक्त तनपुरे, संजीव उदावंत,सचिन(मुन्ना)तनपुरे,अनिल गुंजाळ, ओंकार कासार,अमृत दहिवाळकर,निलेश जोशी यांची प्रमुख उपस्तिथी होती.

 

             या शिबिरात बीपी, शुगर, ईसीजी, दंत तपासणी (एक्स-रेसह), गुडघेदुखी व सांधेदुखी तपासणी, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांसह एकूण ७ प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात आली. एकूण ११० नागरिकांनी नोंदणी करून विविध तपासण्या करून घेतल्या.

 

           रक्तदान शिबिरात जयंत उंडे, इंजिनीअर सुदर्शन साबळे, पत्रकार महेश कासार, पत्रकार श्रेयस लोळगे, सचिन ढवळे,नाना शिंदे, अरिफ शेख, सागर शेटे, अमोल जंगम, नीरज उंडे, प्रताप काशीद, पंकज जाधव, भगवान आव्हाड, अजित उंडे, गौरव लोखंडे, प्रवीण राऊत, साद शेख, राजू जाधव, नील उंडे, साहिल गुप्ता, वसीम अत्तार, सचिन राऊत,आदी २३ युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

 

               या शिबिरास जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शरद बळे, डॉ. ओजस मुनोत, करण भोसले, लोखंडे मामा, मनीषा जोशी, पूजा प्रधान, मेघा शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.साई सुनहरी हॉस्पिटलचे डॉ. अंगराज पवार, लाईफ इन हॉस्पिटलचे डॉ. शुभम क्षीरसागर आणि डॉ. किरण पडघलमल यांचेही विशेष सहकार्य लाभले.

 

            शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नाथ प्रतिष्ठानच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.