शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे : विधान परिषद उपसभापती सचिन अहिर

शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे : विधान परिषद उपसभापती सचिन अहिर

शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे: विधान परिषद उपसभापती सचिन अहिर  

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती नाम. सचिन अहिर यांनी शिंगणापूर-शिर्डी दौऱ्यावर असताना राहुरी येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.  

​या दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख नेते नितीन औताडे, नितीन शेळके आणि सागर बोठे उपस्थित होते. राहुरी येथील कार्यक्रमात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपसभापती सचिन अहिर यांचे जल्पोषात स्वागत केले .

​अमित शाह यांची भेट व पक्षबळकटीवर भर

शिवसैनिकांना संबोधित करताना नाम. सचिन अहिर म्हणाले, "शिवसेना पक्ष हा महायुती सरकारमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला पाहिजे." पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ज्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांचे आमदार नाहीत, तेथे जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी पाठबळ मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे.  

​येणाऱ्या काळात शिवसेना मुख्य नेते नाम. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करायची असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 

 स्थानिक अडचणी व शेतकरी प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन

राहुरी तालुक्यातील सामाजिक विभागाची कामे तात्काळ मार्गी लावली जातील, तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेतील त्रुटी शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिल्यास त्यावर निश्चितपणे सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मंगळवारी मुंबईतील 'नंदनवन' येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीत राहुरीचे नेते राजूभाऊ शेटे यांनी मांडलेल्या सर्व स्थानिक अडचणी व प्रश्न मांडून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील, असेही अहिर यांनी स्पष्ट केले.  

​आपल्या भाषणाचा समाचार घेताना ते म्हणाले, "मी सध्या शासन किंवा प्रशासन नसून एका शिक्षकाच्या भूमिकेत आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शासन व प्रशासनाला एकत्र आणून ते प्रश्न तडीस नेण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन."

​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला शिवसेना नेते राजूभाऊ शेटे, तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष रविंद्र मोरे, युवासेना तालुकाप्रमुख सचिन करपे, संदीप आढाव, सतीश बोरुडे, राहुल तमनर, ऍड. निलेश धुमाळ, ऍड. भाऊसाहेब पवार, ऍड. अमोल शेळके, महेंद्र उगले, साईनाथ कदम, उपतालुकाप्रमुख अनिल आढाव, रोहित नालकर, गौरव शेटे, अंकुश पवार, बापूसाहेब ढोकणे, गंगाराम उंडे, सुभाष जुदरे, गणेश खिलारी, किशोर गाडे, बापूसाहेब काळे, ज्ञानेश्वर धसाळ, गोरक्षनाथ घाडगे, संजय काळे, नदीम शेख, सचिन पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ कदम व महेंद्र उगले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी मानले.

​'राहुरी कारखान्याच्या सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार'

​"राजूभाऊ शेटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली गेली. अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजयाने हुलकावणी दिली. परंतु या निवडणुकीत कोणी साथ दिली आणि कोणी दिली नाही, हा भाग आता दुय्यम आहे.

​ज्या सभासदांनी अत्यंत विश्वासाने आणि खंबीरपणे आपल्या पॅनेलच्या मागे उभे राहून मते दिली, त्या सर्व सभासदांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे."​— नाम. सचिन अहिर

(उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद)