अमरावती चे पोलीस अधिकारी मा.D.C.P. श्री विक्रम साळी साहेब यांच्या हस्ते श्री वीरेंद्र तरटे यांचा BRM-200कि. मी. पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार.

अमरावती चे पोलीस अधिकारी मा.D.C.P. श्री विक्रम साळी साहेब यांच्या हस्ते श्री वीरेंद्र तरटे यांचा BRM-200कि. मी. पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार.

बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

अमरावती-       अमरावतीचे कर्तव्यदक्ष D.C.P. माननीय श्री विक्रम साळी साहेब व तहसीलदार माननीय श्री संतोष काकडे साहेब यांच्या हस्ते श्री विरेंद्र तरटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

"Brevets de Randonneurs Mondiaus" (BRM) 200k.m. पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हे एक फ्रान्स देशातले क्रीडा विभागातील खूप मोठे संस्थान आहे. ही सायकलिंग स्पर्धा अमरावती येथे आयोजित केलेली होती यामध्ये श्री विरेंद्र तरटे यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळाले.

तरटे म्हणाली की खरंतर ह्या अगोदरचा काळ कोरोना महामारी चा काळ होता यामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचं होतं, आणि अशाच प्रकारे मी माझ्या शरीराची व परिवाराची काळजी घेत होतो. "आरोग्य हीच धनसंपदा" ह्या ब्रीद वाक्याचा मी प्रण केला आणि जास्तीत जास्त यामध्ये मी कल दिला. मी रोज सकाळी 4 ते 8 या वेळेत चालायला सुरुवात केली होती. तसेच पुढे 8 ते 10 किलोमीटर रनिंग सुरुवात केली आणि असे करत- करत दररोज नॉन स्टॉप 50 किलोमीटर सायकल वर जाण्याचे धाडस यामध्ये मला BRM ची माहिती मिळाली व त्यामध्ये मी सहभाग घेतला.

27 फेब्रुवारी 2022 रोजी BRM सायकलिंग मध्ये स्पर्धा सुरू असताना खूप अडचणी आल्या. सायकलिंग सुरू असताना माझ्या सायकलचे पेंडल तुटले त्याच परिस्थितीत एकाच पाईंडलवर मी 25 किलोमीटर सायकल नेली, रस्त्यात कुठेही सायकलचे दुकान नसल्यामुळे थोडा त्रास झाला आणि मी अवघ्या 12 तास 36 मिनिटांमध्ये 200km. सायकलिंग स्पर्धेमध्ये यशस्वी झालो आणि मला यश मिळाले.

अशाप्रकारे तरटे यांनी आपल्या यशाची व्यथा सांगितली. हे नांदेड येथील असून अमरावती येथे वोडाफोन- आयडिया कंपनी मध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. अशाप्रकारे अमरावतीचे कर्तव्यदक्ष DCP श्री विक्रम साळी साहेब व श्री तहसीलदार श्री संतोष काकडे साहेब यांनी यांच्या कार्याचे शौर्य पाहून त्यांना पदक पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले.