बार्शी पोलीस बांधवांनी उत्साहात साजरी केली रंगपंचमी
बि.पि.एस.राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बार्शी तालुका पोलीस ठाणे परिसरात पोलीस बांधवांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. कायद्याचे व सुव्यवस्थेचे पालन करून ही रंगपंचमी साजरी करण्यात आली.
यामध्ये सर्व पोलीस बांधव कर्मचारी व स्वतः बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.श्री शिवाजीराव जायपत्रे साहेब यांनी लवकर हजर राहून त्यांच्यासोबत हा एक आपलाच परिवार आहे समजून आपुलकीने, प्रेमाने, हसत-खेळत रंगपंचमी साजरी केली.
त्यामध्ये कुठल्याही पाण्याचा व केमिकल युक्त रंगाचा वापर न करता फक्त कोरडा रंग लावून रंगपंचमी साजरी केली. गेेली दोन वर्षापासून रंगपंचमी साजरी करण्यात आली नव्हती, खरंतर पोलीस बांधवांना कुठलाही सण साजरा करता येत नाही कारण प्रत्येक सणाला दिवाळी असो, दसरा असो वा ईद असो व इतर कुठलीही जयंती असो त्यांना तिथे आपली ड्युटी बजावीच लागते.
खरं तर त्यांना पण इच्छा असतात की आपण पण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करावेत पण देशसेवा, "जनसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा" समजून ते आपले कर्तव्य बजावत असतात. खरंतर रंगपंचमी हा सण आपल्या कुटुंबासोबत, नातेवाईका सोबत साजरी करण्याची इच्छा असते पण पोलीस स्टेशन हेच आपले घर व त्यातील पोलीस बांधव हाच आपला परीवार समजून प्रभारी अधिकारी श्री जायपत्रे साहेबांनी सर्वांसोबत ही रंगपंचमी साजरी केली.
यामध्ये ट्राफिक पोलीस बांधव सुद्धा सहभागी होते खरतर ट्राफिक पोलीस बांधव दिवसभर कडक उन्हामध्ये ड्युटी करत बार्शीच्या जनतेला सुव्यवस्था लावण्याचे काम मनापासून करत असतात. जेणेकरून कसल्याही प्रकारची अडचण जनतेला व व्यापारी वर्गांना होऊ नये यासाठी.
सर्व पोलिस बांधवांना कुठेतरी खंत वाटत असते की आपण आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी उत्सव साजरा करावा पण या परिवारासोबत एक वेगळाच आनंद रंगपंचमीनिमित्त मिळाला.
यामध्ये बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव जायपत्रे साहेब, पोलीस हे.कॉ सहदेव देवकर साहेब. पो.हे.कॉ. श्री हर्षवर्धन वाघमोडे साहेब, पो.ना.महेश डोंगरे, पो.ना.आप्पासाहेब लोहार, पो.ना.विलास भराटे, पो.अंमलदार महादेव धुमाळ, दादासाहेब भांगे, सचिन एकनाथ, प्रवीण शहाणे, अक्षय टोणपे, आदींनी या रंगपंचमीचा मनसोक्त आनंद घेतला.