*हिंदू नववर्ष दिनी नवा उपक्रम; सोलापुरात 75 ठिकाणी "भारत माता" पूजन*
बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सोलापूर :- हिंदू नववर्ष निमित्त अर्थात गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समिती तर्फे सोलापुरात 75 ठिकाणी भारतमाता पूजन करण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 15 मि. हुतात्मा स्मृती मंदिरात संगीत संध्या चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
उत्सव समिती अध्यक्ष श्री पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की गेल्या दोन वर्षापासून म्हणजे कोरोना काळात गुढीपाडव्या निमित्त कोणतेही कार्यक्रम अथवा शोभायात्रा काढण्यात आली नव्हती पण यावर्षी (दि.02-04 वार शनिवार) रोजी गुढीपाडवा आहे. सोलापूर शहरात 75 ठिकाणी गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त स्वागत करण्यात येणार आहे. आपल्या हिंदुस्तान ला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा या अमृत महोत्सव दिना निमित्त सोलापूर शहरात हिंदु नववर्षाच्या समितीच्या वतीने नव वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
यामध्ये 75 ठिकाणी भारत मातेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच त्या दिवशी गुढीपाडवा व हिंदू नववर्ष ला अनुसरून संगीत संध्या हा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री ज्ञानेश्वर म्याकल यांनी केले.