*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी येथे "शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.१" उत्साहात संपन्न.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बळेवाडी- (ता.बार्शी). आज दि.१९-०४-२९२२ रोजी शैक्षणिक वर्ष -२०२२-२३ साठी पहिली दाखल पत्र विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा (क्र.१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी येथे आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बळेवाडी गावचे सरपंच श्री लक्ष्मण मोरे यांच्या शुभाहस्ते मेळाव्याच्या दालनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पालकांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे विविध रंगांच्या तबकात पाय ठेवून शाळेतील पहिले पाऊल कागदावर ठसे उमटून घेण्यात आले. यानंतर प्रत्येक स्टॉलवरील कृती केल्यावर मुलांना टोप्या, फुगे, रुमाल, गुलाब, कॅडबरी चॉकलेट, रंगपेटी, लॉलीपॉप, बिस्किटे, जेम्सची सायकल, पेन्सिल-रबर अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच श्री लक्ष्मण मोरे शाळा व्यवस्थापन समिती बळेवाडीच्या अध्यक्ष सौ. सुरेखा साळुंखे, श्री अमोल पाटील, श्री रवि पोकळे, श्री दत्तात्रेय रेडके, श्री प्रशांत ठोंबरे, माता-पालक तसेच अंगणवाडी सेविका सौ. सुचिता मोरे, मदतनीस सौ. कमल सगरे आणि शिक्षण प्रेमी सर्व बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांना शाळापूर्व तयारी मेळावा साहित्य वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला कोरफळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महादेव शिंदे साहेबांनी धावती भेट दिली. व कार्यक्रमाच्या नियोजना बाबत कौतुकोद्गार काढले. यानंतर उपस्थित सर्व जणांना चहापाणी व खानपान देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद कायते सर, श्रीम.मगर मॅडम यांनी परिश्रम घेतले.