आम आदमी पार्टीची काटोल येथे बैठक संपन्न

1.

काटोल:- आम आदमी पार्टी काटोल तालुक्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. रमनजी मनकवडे सर ,आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक डॉक्टर देवेंद्रजी वानखेडे, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष माननीय जगजीतजी सिंग, व मा.सुनीलदादा वडस्कर, नागपूर जिल्ह्याचे सचिव ईश्वर गजबे, नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मा.गणेशजी रेवतकर, मा.शेखर जी खरपुरिया 
 

मा.वृषभ वानखेडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते
कृषी उत्पन्न समिती च्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या बैठकीला शेकडो लोकांची उपस्थिती राहाली काही लोकांना बसायला जागा नसल्यामुळे उभे राहूनच मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा लागला त्याबद्दल आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली व भविष्यातही आम आदमी पार्टीला असाच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.