*देशाला बुद्धांचे विचारच महासत्ताक बनवू शकतात-भीमराव आंबेडकर*

काटोल:- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातु व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे काटोल येथे भव्य स्वागत करण्यात आले.
नरखेड येथे धम्म मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यानी डॉ.आंबेडकर चौकात फटाक्यांची आतीशबाजी व नारेबाजी करत कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले.
 
नरखेड येथे बौद्ध धम्म बांधवांच्या वतीने भव्य धम्म देसणा रैली व धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जात असताना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकर यांचे काटोल येथील डॉ.बाबासाहेब चौकात वंचित बहुजन आघाडीच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यानी व बौद्ध बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प काटोल चे माजी सभापती.दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात. ढोल व फटाक्यांची आतीशबाजी करत
जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर बुद्धमय दिसत होते.

 डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले, यावेळेस बौद्ध बांधवांना मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकरांनी वरील विचार मांडले यावेळेस ज्येष्ठ नेते भीमराव बनसोड ,दिगांबर डोंगरे प्रा.विरेंद्र इंगळे, सुमेध गोन्डाने,भीमराव फुसे,गुलाबराव शेंडे यांनीही काटोल येथे चालवीत असलेल्या आंबेडकरी चळवळीची माहिती सांगितली,
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.अशोकराव झाम्ब्रे यांनी तर प्रास्ताविक मिना पाटील यांनी तर आभार जानरावजी गावंडे यांनी मानले.

यावेळी सुरेशराव देशभ्रतार, अरुण सोमकुवर ,हर्षद बनसोड ,पांडुरंग खोब्रागडे ,अशोक बागडे, रवी दलाल ,कृष्णाजी गवईकर, बाबाराव गोन्डाने ,श्रीकांत गौरखेडे, शंकर काळभांडे, दिगांबर भगत ,बाबा तागडे ,कृष्णाजी ढोके ,विजय दहाट ,सतीश पाटील,मनीष रामटेके ,सरोज चक्रवर्ती, प्रध्ण्या डोंगरे,अनिता पाटील ,विद्या तागडे,
दीपिका तागडे ,सविता गजभिये, मोना सोमकुवर, सुषमा, गजभिये,सुरभी ढेन्गरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व बौद्ध बांधव उपस्थित होते.