बालहक्कदिना निमित्त जिला परिषद शाळा - कळमेश्वर येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन व महीमा बहुउद्देशीय सामाजीक संस्था यांच्याद्वारे मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आले .
बालहक्कदिना निमित्त जिला परिषद शाळा - कळमेश्वर येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन व महीमा बहुउद्देशीय सामाजीक संस्था यांच्याद्वारे मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आले.
प्रतिनिधी - वाहिद शेख
नागपूर-ग्रामीण : आजही आपण स्त्रीभृणहत्या , बालकामगार , बालविवाह इत्यादि . समाजामध्ये घडतांना बघतो. ह्या समस्यांवर मत करण्यासाठी बालकांची जात , वर्ण ,लिंग ,भाषा , धर्म यांचा विचार न करता जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगिण विकासाचा हक्क असून त्याला सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
त्याअनुषांगणे नागपूर जिल्ह्ातील कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन व महीमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या द्वारे नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कळमेश्वर येथील जिला परिषद शाळा नंबर ३ येथे बाल हक्क दिनावर शाळेतील विद्यार्थी वर्गाला महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी एकुण १५० विद्यार्थ्यांच्या (बालकांच्या) उपस्थितीत महीमा बहुउद्देशीय संस्थेच्या संचालीका सौ शीतलताई अमीत पाटील यांनी बालकांना बाल हक्क संबंधी मार्गदर्शन केले . आणि बालकामगार व बालविवाह या बद्दलही माहीती दिली. तसेच महिमा बहुउद्देशीय संस्थेच्या राणी कळमकर यांनी बाल तस्करी बद्दल माहीती दिली व विद्यार्थी वर्गाला सुरक्षित कसे राहता येईल याबद्दल मार्गदर्शन केला .
जिल्हा परिषद बाल संरक्षण अधिकारी श्री प्रसन्नजित गायकवाड यांनी बालकांना बाल संरक्षण. आरोग्य. शिक्षण याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. बालकांचे अधिकार व चागंला स्पर्श आणि वाईट स्पर्श (Good touch & bed touch ) कसा ओळखावा या गंभीर विषयावर वर्षा पाटील यांनी बालकांना माहीती दिली . त्याबरोबर उपस्थित बालकांनी ही अशा गंभीर विषयावर आप-आपली मते मांडली यासोबतच सदर कार्यक्रम शांततेने व समाधानिक रित्या पार पडला .
कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुख्यध्यापिका श्रीमती रोशनी उके व वर्गशिक्षक सौ उषा दिक्षीत , श्रीमती राखी भारती , श्रीमती बरखा सोंगले , सौ विदया बांदे , सौ आम्रवृक्षा लांबधरे , श्री जगन्नाथ धुर्वे, श्री रंजीत नागदिवे इत्यादि शिक्षकगण व कर्मचारी वृंद उपस्थित होते .