रस्ताला अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब हटविण्याची मागणी !!

रस्ताला अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब हटविण्याची मागणी !!

रस्ताला अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब हटविण्याची मागणी !!

सावनेर : दि.25 - शहरातून जाणाऱ्या उघड्यावरील विद्युत तारांमुळे अपघात होऊ नये, म्हणून शासनाने लाखो रुपये खर्चाच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामाला मंजुरी दिली.

या कामाचे धुमधडाक्‍यात उद्‌घाटनही झाले

मात्र सावनेर शहराच्या काही प्रभागामध्ये अवस्था बिकट आहे. तसेच सावनेर स्थित सटवा माता मंदिर परिसर येथे वास्तव्य करित असलेले श्री कारेमोरे आणि श्री खुरसंगे यांच्या घरा समोरील रस्तेच्या मधोमध उभे असलेले सिमेंटची विद्युत खांभ एखादी अप्रिय घटनेला आमंत्रण देत आहे ,त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. 

बहुतेक खांबांवर या तार सतत डोलत असतात. 

एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ?

अशा प्रश्न स्थानीय नागरिकांच्या डोळ्यांसमोर निर्माण झाले आहे.

सटवा माता मंदिर परिसरात लटकणाऱ्या विद्युत तारा नागरिकांसाठी धोक्याचे कारण बनल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे वीज विभाग बेफिकीर आहे. शहरात अनेक ठिकाणी खांबांवर या तारा लोंबकळत आहेत, मात्र त्या पाहण्याचा व दुरुस्त करण्याचा अधिकार विभागाला असुन वीज विभाग डोळे झाकून बसला आहे.

जेनेकरून शहरातील सटवा माता मंदिर परिसर , साई मंदिर परिसर आणि गणेश मंदिर परिसर या भागातील विद्युत तारा भूमिगत करण्यात याव्हे व रस्तेच्या मध्य स्थित विद्युत खांब हटविन्यात यावे त्यामुळे रहिवासियांना  या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी सटवा माता मंदिर परिसराचे जागरुक व सक्रिय कार्यकर्ता विनीत पाटिल यांनी उपअभियंता( म.रा.वि.वि.)सावनेर यांची भेट घेउन वर्तमान समस्या बाबत निवेदन दिले. 

निवेदन देतांना विनीत पाटिलसह अक्षय आवारी,प्रशांत उके, मयूर शेंडे,पवन राऊत,भूषण आवारी, राजकुमार गडकोंडले,विकी शेंडे, अनिल धुर्वे,भरत धुंडूळे, राहुल नाहरकर,आशिष गवली,आदेश चरपे, अभिषेक दास, प्रफुल बसवार, आकश ढोके ,नावेद शेख, सुनील मानकर, अक्षय बिलवार, जयदीप खाटिकर, शुभम चोवधरी, रोहन जरारे, संकेत गमे, सोनू हजारे, शुभम जोगी, मोनू देरकर, अभिषेक सराटे, मुकेश बनसोड , अक्षय नकाशे, प्रतीक लाटकर, प्रणय लाटकर, मयूर गाडगे इत्यादि स्थानीय कार्यकते उपस्थित होते .