तहसील कार्यालय वरूड येथील कर्मचारी /अधिकारी यांनी शासनाला दाखविली केराची टोपली .

तहसील कार्यालय वरूड येथील कर्मचारी /अधिकारी यांनी शासनाला दाखविली केराची टोपली .

तहसील कार्यालय वरूड येथील कर्मचारी /अधिकारी यांनी शासनाला दाखविली केराची टोपली .

(प्रतिनिधी - वाहिद शेख)

वरूड : (दि.८ मे ) राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळया शासकीय कार्यालयात येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहित होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतू अमरावती जिल्ह्ातील वरूड तहसील कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी/कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र (identity card )लावत नाहीत. ओळखपत्राबात एखाद्या नागरिकांने विचारणा केली असता शासकीय अधिकारी / कर्मचारी ओळखपत्र दाखवित नाहीत. 

राज्य शासनाने आधीच याबद्दल परिपत्रक- ७ मे, २०१४ रोजी काढलेला असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे व त्याचा संकेताक क्र.२०१४०५०८१२२५५८५८०७ असा आहे.

सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने राज्य शासनाने स्पष्टपणे परिपत्रकात आदेशात नमुदित केलेले आहे की सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यास कुचराई करणा- या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याविरूध्द वरिष्ठ अधिका-यांनी योग्य ती कारवाई करावी . हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आलेला आहे. 

सदर आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असे परिपत्रकात नमूद असतानासुध्धा वरूड तहसील कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे . अशा कर्मचारी/अधिकारीमुळे वरूड तालुक्यातील नागरिकांना गैरसोय होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित कर्मचारी/अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे . नियमबाह्य कार्यकरणाऱ्या अशा कर्मचारी/अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही होणार आहे याकडे वरूड तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे .