विनीत पाटील मित्र परिवार आणि यंग बॉयज तर्फे भव्य शिबिराचे आयोजन !!!!

1.

विनीत पाटील मित्र परिवार आणि यंग बॉयज तर्फे भव्य शिबिराचे आयोजन !!!

प्रतिनिधी- वाहिदशेख

सावनेर - दि.3 एप्रिल: शहरातील सामाजिक युवा कार्यकर्ते विनीत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिय सटवा माता मंदिर परिसर वार्ड क्र.5 येथे विनीत पाटील मित्र परिवार आणि यंग बॉयेज तर्फे श्री देवेंद्रजी राऊत यांचा घराजवळ भव्य स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले . 


शिबिरात गरजू लोकांना सहज व किफायतशीर दराने ई-श्रम कार्ड , पॅन कार्ड व सर्व प्रकारचे PVC कार्ड (स्मार्ट कार्ड) मिळावे या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ई-श्रम कार्ड हे असंगठीत कामगार गरीब व हातमजुर यांच्यासाठी असून या योजनेनुसार लोकांना आणखी अनेक मोठे फायदे दिले जात आहेत.  एकीकडे काही योजनांमध्ये लोकांना रोजगार, विमा संरक्षण अशा सुविधा दिल्या जातात, तर दुसरीकडे काही योजनांमध्ये लोकांना आर्थिक मदत केली जाते.  ही योजना ई-श्रम कार्ड योजना आहे, ज्याचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
दुसरीकडे, तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असल्यास, तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.  एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात.  त्याचबरोबर त्या व्यक्तीला अपंगत्व असल्यास एक लाख रुपयांची रक्कम उपलब्ध आहे.
शिबिराचे आयोजन विनीत पाटील ,अक्षय आवारी, प्रशांत उके, मयूर शेंडे,पवन राऊत,भूषण आवारी, राजकुमार गडकोंडले,विकी शेंडे, अनिल धुर्वे,भरत धुंडूळे, राहुल नाहरकर,आशिष गावली, अभिषेक दास, आकश ढोके ,नावेद शेख, अक्षय बिलवार, जयदीप खाटिकर,शुभम चोवधरी,  रोहन जारारे, संकेत गमे,सोनू हजारे, शुभम जोगी,मोनू देरकर, अभिषेक साराटे, मुकेश बनसोड ,अक्षय नकाशे,प्रतीक लाटकर,  प्रणय लाटकर,मयूर गाडगे,यश गोतमरे,सुशील मानवटकर व संपूर्ण मित्र परिवार (सटवामाता मंदिर परिसर) यांनी पार पाडले .

Next