बेलोना येथील मेंढपाळ अरविंद बांबल मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा - धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .

बेलोना येथील मेंढपाळ अरविंद बांबल मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा - धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .

_____________________________________________

बेलोना येथील मेंढपाळ अरविंद बांबल मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा - धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .

_____________________________________________

 ( प्रतिनिधी : वाहिद शेख )

नागपूर - दि 28 :  ग्रामपंचायत बेलोना तहसील नरखेड येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबल यांनी अन्यायकारक कारवाई विरुद्ध संबंधित अधिकारी यांच्या कडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली . मृतक अरविंद बांबल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांच्या कुटूंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकऱ्यांच्या शिष्टमंडळाने 26 ऑगस्ट 2024 सोमवारी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर याना एका निवेदना द्वारे केली .

बांबल कुटूंबियांचा राजस्व विभागाच्या जागेवरील मेंढ्या करीता बांधलेला गोठा पाडला यामुळे अरविंद बांबल यांनी स्वतःला जाळून घेतले ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कारवाई विरुद्ध स्वर्गीय अरविंद बांबल यांनी मृत्यूपूर्वी 6 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस समक्ष बयांनानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असी सकल धनगर समाज नागपूर , सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ , धनगर समाज संघर्ष समिती , धनगर समाज जनजागृती मंच , महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच धनगर युवक मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती मल्हार सेना आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली . तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले .

निवेदन देतांना  शिष्टमंडळात प्रामुख्याने रमेश पाटील देविदास , आगरकर ऍड मार्कन्ड गोडे , प्रा बाबा टेकाडे , पुरुषोत्तम थोटे , अनिलकुमार ढोले , ज्ञानेश्वर साव , गणेश पावडे ,रामचंद्र चुकांबे , प्रशांत खाडे , देवेंद्र रोकडे, किशोर खारपाहे , दिगंबर भगत , मनीष बांबल , रुखमा बांबल , देवेंद्र ठोंबरे , प्रमोद वाडबुदे , देवेंद्र थोटे , शरद बांबल , दिनकर थोटे , देविदास घायवट , दिगंबर डोंगरे , सुरेश थोटे , नथू ढवळे , निलेश भाकरे , विनोद बरडे , सुरेंद्र चमेले , मधुकर काळमेघ , डॉ रमेश ढवळे , महादेव पातोड , दीपक अवताडे , नामदेव खाटके , साहेबराव सरोदे , वत्सल रोकडे , तुळशीराम आगरकर , महादेव पातोड , नारायण बोबडे तथा नागपूर जिल्ह्यातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते .