सावनेर शहरात हर घर तिरंगा अभियान पदयात्रा काढून साजरा करण्यात आले.
1.
सावनेर शहरात हर घर तिरंगा अभियान पदयात्रा काढून साजरा करण्यात आले.
ब्यूरो प्रतिनिधी- वाहिदशेख
सावनेर : दि. 12 ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान तहसीलदार प्रताप वाघमारे सावनेर यांच्या मार्गदर्शनात पदयात्रेचा आयोजन करण्यात आले . याप्रसंगी तहसीलदार यांच्या द्वारे हर घर तिरंगा पदयात्रेची सुरुवात ढोलताशांचा गर्जनेने तहसील परिसरात पार पाडण्यात आले.
ह्या दरम्यान तहसीलदार वाघमारे , उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, नगर परिषद मुख्याधिकारी हर्षला राणे , पोलीस निरीक्षक मारुती मूळक व पंचायत समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व शासकीय अधिनिस्थ कर्मचारी यांचे सोबत सावनेर शहरातील मुख्य मार्गाने पदयात्रा करून हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यात आले.
यामध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, इंडियन मेडीकल असोशीसन ,राष्ट्रीय मराठी युवा पत्रकार संघ- सावनेर , लॉयांस क्लब सावनेर , पोलीस विभाग , वाहतूक विभाग सावनेर , सामाजिक संगठना व सामजिक कार्यकर्ते सहभागी होते. दरम्यान संपूर्ण शहरात पदयात्रा काढण्यात आले व जयघोष करण्यात आले.
शहरातील बाजार चौक येथील जय स्तंभावर प्रशासकीय अधिकारी यांचा द्वारे माल्यार्पण करून रॅली पुढे काढण्यात आली.
तसेच गाँधी चौकातील महात्मा गांधी प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना नमन करण्यात आले.
यापुढे पदयात्रा दरम्यान बसस्थानक जवळ असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार करून नमन करण्यात आले.
ह्या नंतर पदयात्रा नगर परिषद कार्यालय प्रागण सावनेर येथे मान्यवरांचे हस्ते दिवंगत स्वतंत्रता संग्राम सेनानी यांचे वारसांचा सत्कार व नगर परिषद प्रांगणात वृक्षारोपण करून हर घर तिरंगा अभियान पार पाडण्यात आले .
75 व्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात आलेला हर घर तिरंगा उपक्रमात समस्त सावनेर तहसील कार्यालय कर्मचारी , पोलीस कर्मचारी , नगर परिषद कर्मचारी , सर्व सावनेर पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते आणि स्वतंत्रता संग्राम सेनानी यांचे वारस मा. निळकंठ खडसे व इतर स्वतंत्र संग्राम सेनानी वारसांचे आभार प्रकट करण्यात आले .