बालविवाह मुक्त भारत मोहीम राबविण्याबाबत कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन तर्फे शुभेच्छा .

बालविवाह मुक्त भारत मोहीम राबविण्याबाबत कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन तर्फे शुभेच्छा .

बालविवाह मुक्त भारत मोहीम राबविण्याबाबत कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन तर्फे शुभेच्छा .

ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख

नागपूर :( दिं.9 फेब्रुवारी) लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो. जी शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते. कायद्यात लग्नाचे वयही निश्चित करण्यात आले आहे. जर मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर अशा विवाहाला बालविवाह म्हटले जाईल.

नोबेल शांती पुरस्कार विजेते श्री कैलाश सत्यार्थी यांच्या पुढाकाराने दिनांक 16 ऑक्टुंबर 2022 ला संपूर्ण भारतात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.त्याच अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था व इतर सामाजिक संस्था द्वारे मोठ्याप्राणावर जनमानसात बालविवाह विषयी जनजागृती व केंडल मार्च करण्यात आली .

महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष सौ शीतल अमित पाटील यांनी जनतेला आवर्जून सांगितले की निरक्षरता- शिक्षणाअभावी लोकांना बालविवाहाचे दुष्परिणाम माहित नाहीत. तसेच स्त्री शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे बालविवाह होत आहेत.

बहुसंख्य शेती- भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण आहे, जी शेती आणि पशुपालनाद्वारे आपला उदरनिर्वाह करते. या दोन्ही कामात अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने लहान वयातच लग्ने केली जातात.

बालविवाह हे मानवी हक्कांचे थेट उल्लंघन आहे. बालपणीचे दिवस म्हणजे मुलगा/मुलगी खेळण्याचे आणि वाचण्याचे दिवस असे होय .

बालविवाह प्रथेला आपण विरोध करून याबद्दल जनजागृती करावे असे ही शीतल पाटील यांनी आपल्या भाषणात जनतेला संबोधित केलं आहे .

संस्थेच्या अध्यक्ष सौ शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीताबर्डी चौक येथून बालविवाह विरुद्ध केंडल मार्च रैली काढून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली .

रैलीचे समापन संविधान चौक येथे स्थित प.पू. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आले . कैंडल मार्च रैली मध्ये प्रामुख्याने बाळ संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण उपस्थित असून 16 ऑक्टोबर 2022 रोजी बालविवाह मुक्त भारत अभियान पार पाडण्यात आले .

महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था द्वारे राबविण्यात आलेल्या 16 ऑक्टोबरच्या या बालविवाह मुक्त भारत मोहिमाअंतर्गत करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला नोबेल शांती पुरस्कार विजेते श्री कैलाश सत्यार्थी यांनी महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्थाध्यक्ष सौ शीतल पाटील यांना कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन तर्फे शुभेच्छा देण्यात आले.

नोबेल शांतता पुरस्कार विजेते श्री कैलाश सत्यार्थी यांनी 16 ऑक्टोबर 2022 रोजी बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या तळागाळातील सर्वात मोठ्या चळवळीला शीतल पाटील यांच्या संस्था द्वारे पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्यात सामील झाल्याबद्दल महिमा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ शीतल पाटील यांचे आवर्जून कौतुक केलं . या मोहिमेमध्ये 20 दशलक्षाहून अधिक लोकांचा सहभाग होता आणि 75,000 हून अधिक लोकांनी त्याचे नेतृत्व केले. सुमारे 500 जिल्ह्यांतील 10000 गावांतील महिला यांनी ही पाठिंबा दिला .

गेल्या काही दिवसांपासून बालविवाह हा विषय देशभरात ठळक आणि चर्चेचा मुद्दा आहे. बालविवाह आणि मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी आसाम सरकारने या संदर्भात केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.

तुमच्या सामुहिक पाठिंब्याने बालविवाहाविरोधातील चळवळ या टप्प्यावर पोहोचली आहे जिथे राज्य सरकारने बालविवाह आणि मुलांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

असे म्हणून नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था अध्यक्ष सौ शीतल पाटील यांच्या मोलाचे कार्याच्या कौतुक करून धन्यवाद केले.