हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "जल-पे-चर्चा" व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त "एकलगीत स्पर्धा"**

हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "जल-पे-चर्चा" व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त "एकलगीत स्पर्धा"**

                                                                                         

**हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "जल-पे-चर्चा" व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त "एकलगीत स्पर्धा"**

नागपूर जि. प्रतिनिधी सुनील सोमकुंवर                        पारशिवनी:-

हरिहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवणी येथे "एक भारत श्रेष्ठ भारत" व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी भाषा,साहित्य संस्कृती क्रिडा,पर्यटन कला,उत्सव परंपरा व इतर माध्यमातून समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य व ओडीसा राज्याचा कटिबद्ध गट तयार करण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतभर "एक भारत,श्रेष्ठ भारत" व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त दि.०५ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला एकलगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.कु.राखी काळसर्पे,काजोल जामगडे,वैष्णवी भगत,अनुज साखरे,पायल मेंघर,सानिया शेख,वैष्णवी कोटगुले,पवन सातपैसे,चिराग फुलबांधे,अथर्व दिवटे,आदित्य जनबंधू,पियुष कुंभलवार,हर्षदा जुनघरे,प्रज्वल तरारे,तृप्ती राऊत,प्रविण येलकर या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर,राष्ट्रिय एकात्मतेवर आणि सर्वधर्म समभाव याविषयांवर कविता,गीतगायन सादर केले.

           

याशिवाय ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत "जल-पे-चर्चा" या कार्यक्रमाविषयी श्री.देवराज पाटील , किरण भोयर मॅडम,अल्पेश भगत,अंकीत देशमुख,धर्मेद्र दुपारे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भगत सर होते.सूञसंचालन श्री.ताराचंद चव्हाण यांनी केले तर आभार श्री.महल्ले सरांनी मानले.