श्रीराम साधना आश्रम रामनगर येथे ब्रह्मलीन स्वामी प्रकाश गीरिजी महाराज हरिद्वार यांची प्रथम पुण्यतिथी सोहळा होणार साजरा.

नेवासा तालुक्यातील श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुर (रामनगर )येथे देि.४ व देि.५ रोजी ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी प्रकाश गिरीजी महाराज पंचायती निरंजनी आखाडा हरिद्वार यांची प्रथम पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.

         त्यानिमित्ताने रविवार देि.४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भागवताचार्य साध्वी तुलसी दीदी सोनई यांचे कीर्तन होइल. व तद्नंतर श्री विनायक विठ्ठल लिगायत परिवार देवगाव यांचा फराळाचा महाप्रसाद होइल. व सोमवार दि.५ रोजी महंत मुक्तानंद गीरीजी महाराज वेल्हाळे संगमनेर यांचे सकाळी ११ते १२ वेळेत किर्तन होईल व लगेच महाआरती आणि पुष्पृष्टी तदनंतर महाप्रसाद होइल. या प्रसादाचे मानकरी चेनाराम श्री. नंद रामजी चौधरी असतील अशी माहिती श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरी महाराज यांनी दिली व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली.

   या कार्यक्रमाचे ठिकाण श्रीराम साधना आश्रम रामनगर चारी नंबर 3 मुकिंदपुर . ता नेवासा जि. अहमदनगर.