*अंबाडा-सोनक येथील चिमुकल्या विद्यार्थी सहभागाने एक अनोखी शिव जयंती साजरी*
काटोल:- माणुसकी सामाजिक संस्था खंडाळा खुर्द द्वारा छत्रपती शिवाजी जयंती निमित्ताने अंबाडा सोनक येथे,छत्रपती शिवाजी महाराज खेळाचे मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रवीण वस, अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित गद्रे, अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी, सौ. जयवार मॅडम, जिल्हा परिषद शाळा अंबाडा, दिगंबर टुले, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर, श्री साठवणे आणि उज्वल पातोडे हे प्रथम एज्युकेशन संस्थेचे समन्वयक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये प्रा. दिगंबर टुले यांनी माणुसकी सामाजिक संस्था मागच्या दोन वर्षापासुन अंबाडा सोनके येथे कोणकोणते उपक्रम राबवित आहे याच्या बद्दल माहिती दिली.
एक ग्रंथालय माणुसकीचे सामुदायिक सहभागाचे, सर्वांसाठी खेळअसे दोन मोठे उपक्रम, शिवरायांच्या जयंती चे उपक्रम येथे राबविण्यात आलेले आहे. अशी त्यांनी माहिती दिली,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. जयवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले कशी कामी पडतात याबद्दलची माहिती सांगितली.
डॉ. अमित गद्रे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा आणि सामाजिक कामात पुढे यावी याकरता मार्गदर्शन केले.
श्री साठवणी यांनी विद्यार्थ्यांना प्रथम मार्फत कोणकोणते उपक्रम गावामध्ये राबविण्यात येणार आहे याबाबतची माहिती त्यांना सांगितली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उज्वल पातोडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड्डू खंडाते, हर्षल, गौरव, मानसी, उमेशभाऊ टावरी, सौ.अर्चना आहाके, सौ. जोत्सना टुले यांनी सहकार्य केले.