*फौजदारी प्रकरण दाखल असल्यामुळे अधिकाऱ्याकडून गुन्हेगार सारखी वागणूक* *पीडित सुरक्षा रक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत*
1.
*फौजदारी प्रकरण दाखल असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून गुन्हेगार सारखी वागणूक*
*पीड़ित सुरक्षा रक्षक न्यायाच्या प्रतिक्षेत*
*न्यायालयात व मानवाधिकार आयोगमध्ये होणार प्रकरण दाखल*
BPS Live news N-Delhi
नागपूर:-जो पर्यंत न्यायालय अपराधी घोषित करत नाही , तो पर्यंत तो आरोपी निर्दोषच असतो अशे सर्वोच्च न्यायालयने एका प्रकरणात स्पष्ट नमूद केले आहे, अशे असूनही सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील औषणीक विद्युत केंद्र व नागपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळच्या अधिकाऱ्यांद्वारे एका फौजदारी प्रकरणात आरोपी असल्याच्या कारणावरुन
एका गरीब पीड़ित सुरक्षा रक्षक राजेन्द्र दिलीप वगारे याला नौकरीवर पुनर्नियुक्ति न देता त्याच्या मानवाधिकारचे हनन केल्या जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना वकीलाद्वारे नोटीस पाठविला असून लवकरच उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे याचीका दाखल होणार आणि सर्वोच्च न्यायालय आणि मानवाधिकार आयोग मध्ये सुद्धा अवमानना याचिका दाखल होणार असल्याची माहितीं पीड़ित सुरक्षा रक्षक कडून प्राप्त झालेली आहे .