*आयु.एम.ए.जाधव सकलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांच्या पत्र संवाद पुस्तकाचे प्रकाशन*

1.

*आयु.एम.ए. जाधव संकलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांचा पत्र संवाद पुस्तकाचे प्रकाशन*
*BPS Live news N-Delhi*
मुंबई:-बृहन्मुंबई महानगरपालिकेचे
माजी प्रशासकीय अधिकारी, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी कोषाध्यक्ष आणि पाली भाषेचे अभ्यासक आयु. एम. ए. जाधव यांच्या संकल्पनेतून संकलित केलेले *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांचा पत्र संवाद* पुस्तकाचे प्रकाशन

रविवार दिनांक २९ मे,२०२२ रोजी सायं 5 वा चैत्यभूमी मध्ये चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीपजी कांबळे, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष संजय कापसे, शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्येकर्ते प्रफुल पुरळकर,महेश वळंजु,प्रविण पवार,हरेंद्र कांबळे , भूपेंद्र खैरकर साहेब , रामचंद्र सकपाळ सर आणि दीपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

एम.ए. जाधव यांनी अनेक पुस्तकें संकलित करून प्रकाशित केलेली असून ती त्यांनी अनेक विहारे,संस्था आणि धम्म उपासक यांना विनामूल्य दिलेली आहेत. सदर पुस्तकातील पत्रे अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.सर्व मान्यवरांनी एम.ए. जाधव साहेब यांच्या विषयी मंगल कामना व्यक्त केल्या.

संजय कापसे सरांच्या वॉलवरून साभार

Next