काटोल शहरात जागतिक क्षयरोगदिनानिमित्त क्षयरोग विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले..
बी.पी.एस लाईव्ह न्युज,दिल्ली
तालुका प्रतिनिधी :- मयुर बाबु कुमरे
काटोल :- दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, काटोल आणि ग्रामीण रुग्णालय, काटोल यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करून काटोल शहरात क्षयरोग विषयक जनजागृती करण्यात आली. रॅलीचे आयोजन ग्रामीण रुग्णालय काटोल मा. डॉक्टर दिनेश डवरे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय काटोल यांनी उपस्थितांना याबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करणे बाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर शशांक व्यवहारे तालुका आरोग्य अधिकारी, काटोल डॉक्टर प्राध्यापक तेजसिंग जगदाळे नबीरा कॉलेज काटोल यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या करिता श्री सुभाष कावटे तालुका पर्यवेक्षक , प्रशांत वीरखरे , श्री प्रताप वाढबुधे , विशाल श्रीखंडे, हितेंद्र नांदेकर, संजु नैताम , मयूर कुमरे , सुनिल बोलमवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रयत्न केले.
क्षयरोग हा इतर सामान्य आजारासारखा असून उपचार पूर्ण केल्याने बरा होणारा आजार आहे दोन आठवड्याचा खोकला सतत ताप वजनात घट ही लक्षणे असल्यास व्यक्तीने तात्काळ थुंकी तपासणी करून घेणे बाबत चा संदेश सामान्य जनते पर्यंत पोहोचविण्याचा या रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला.