पंचशिल बौद्ध विहार काटोल येथे वर्षावास समाप्ती सोहळा संपन्न
1.
काटोल:- तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बूध्त्व प्राप्त झाल्यानंतर आषाढी पोर्णिमेपासुण तर अश्विन पोर्णिमेपर्यत तीन महिने प्रत्येक भीक्खुनी वीहारात वर्षावास चालु करावा व प्रत्येक गावात प्रत्येक अनुयायांना धम्म समजावुन धम्माचे विचार द्यावे असे उपदेश दिला. त्यानुसार वरील काळात प्रत्येक वीहारात बौद्ध उपासक उपासकीना सोबत घेवुन भीक्खु वर्षावास करत असतात या दिवसात प्रत्येक भीक्खु वस्तीत जाऊन चारीका करून ज्या घरी भोजन करतात त्या घरी धम्मद्यान देवून त्यांना उपदेश देत असतात.
त्याच प्रमाणे काटोल येथील पंचशिल बौध्द विहार येथे भीक्खुनी विनयशिला यांनी वर्षावास चालु करून नित्य वीहारात व उपसकांच्या घरी जाऊन बौद्ध विचार देण्याचे कार्य केले. त्यांच्या वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम पंचशिल बौद्ध वीहारात संपन्न झाला यावेळेस सकाळी पुजापाठ महापरीत्रान पाठ करण्यात आला, त्यानंतर उपासकानी उपस्थित भीक्खुनीना उपासीका सुषमा सहारे यांच्यासह महिला भगीनीनी चीवर व अष्ट वस्तू भेट प्रदान केले. त्यानंतर भीक्खुनी शीलाचारा यांच्या अध्यक्षतेखाली तर भीक्खुनी बोधीशीला भीक्खुनी थुलनंदा भीक्खुनी शोभीता यांनी धम्माचे उपदेश धम्मदेसणा उपासकाणा प्रदान केली.
प्रमुख उपस्थितीती काटोल चे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकुर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे व माजी नगर सेवक प्रा.देविदास कठाने प्रा. रमेश येवले यांनीही आपले विचार व्यक्त केले. तर प्रसिद्ध कवयत्री सरीता रामटेके यांनी भीम बुद्ध विचाराच्या कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळेस संचालन अर्चना डोंगरे यांनी तर प्रास्ताविक मिना पाटील यांनी तर आभार पिंकी शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मिना पाटील सुषमा सहारे प्रतिमा देशभ्रतार सरीता रामटेके.वर्षा सोमकुवर, रमाबाई गजभिये,सविता गजभिये, विद्या तागडे, मायावती गजभिये, बेबी शेंडे,हरप्रीया भालेराव,ईन्दुबाई पाटील, अनिता गजभिये,मनिषा शेंडे यांनी अथक प्रयत्न केले.कार्यक्रमाला राहुल सहारे,प्रकाश देशभ्रतार, प्रद्न्या डोंगरे,गुलाबराव शेंडे, पांडुरंग खोब्रागडे आवर्जून उपस्थित होते.