स्टार्टअप महाराष्ट्र २०२२ यात्रेचे झेविअर आयटीआय , श्रीरामपूर येथे जल्लोशात स्वागत

केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडियाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार , उद्योजगता व नाविन्यता विभागामार्फत स्टार्ट अप यात्रेचे दि . ३०.०८ . २०१२ रोजी सकाळी १० वाजता झेविअर आयटीआय श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले होते.

स्टार्टअप महाराष्ट्र २०२२ यात्रेचे झेविअर आयटीआय , श्रीरामपूर येथे जल्लोशात स्वागत

स्टार्टअप महाराष्ट्र २०२२ यात्रेचे झेविअर आयटीआय , श्रीरामपूर येथे जल्लोशात स्वागत - केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडियाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार , उद्योजगता व नाविन्यता विभागामार्फत स्टार्ट अप यात्रेचे दि . ३०.०८ . २०१२ रोजी सकाळी १० वाजता झेविअर आयटीआय श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शासकीय आयटीआय श्रीरामपुरचे प्राचार्य श्री . थोटे साहेब, स्टार्टअप इंडिया यात्रेचे समन्वयक श्री . संकेत जयस्वाल, लोयोला सदन चर्च प्रमुख धर्मगुरु व डिस्ट्रीक्ट सुपेरियर रेव्ह. फादर ज्यो गायकवाड , झेविअर आयटीआय , श्रीरामपूरचे संचालक रेव्ह. फादर संपत भोसले , प्राचार्य, श्री . बनकर सर, भास्करराव गलांडे पाटील आय टी . आय, अशोकनगरचे प्राचार्य, श्री . शेख सर , शासकीय आयटीआय श्रीरामपुरचे निदेशक श्री . भगत सर , श्री चौधरी सर , श्रीमती. घोडके मॅडम , माजी शिल्प निदेशक श्री . निकाळे सर , शासकीय टेक्निकल हायस्कूलचे निदेशक श्री. शेख सर, श्रीमती. ठाणगे मॅडम, आयटीआय , श्रीरामपूरचे सर्व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी , सेंट झेविअर स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय श्रीरामपुरचे विद्यार्थी व स्टाफ भुजबळ मिनाक्षी मंडम व झेविअर आयटीआय , श्रीरामपूरचा सर्व स्टाफ व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचा शुभारंभ डिस्ट्रीक्ट सुपीरियर रेव्ह.फादर ज्यो गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ फोडून झाला, त्यानंतर सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांचा शाॅल पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केला गेला . यानंतर शासकीय आयटीआय श्रीरामपुरचे प्राचार्य श्री . थोटे सर यांनी या यात्रेमागचे नियोजन थोडक्यात सांगीतले. या योजनेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुष प्रशिक्षणार्थी यांच्यातील सुप्त गुणांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा ऊपक्रम सरु केला असून अनेकांकडे नवीन कल्पना नवीन शोध असतात . त्यामध्ये शेती क्षेत्रात असो , इंडस्ट्रीज , इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, अशा अनेक क्षेत्रात काही तरी डेव्हलपमेन्ट करायची इच्छा असते . या नवनिर्मिती करणा-या व्यक्तींना प्रोत्साहन अर्थिक पाठबळ या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे . जर एखाद्याला नवीन उद्योग व्यवसाय उभारणीसाठी अर्थिक मदतही शासनाकडून दिली आहे . त्या अनुषंगाने सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे अवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमात मोबाईल व्हॅन व्दारे स्क्रिनवर नव ऊद्योजकांचे अनुभव , त्यांना मिळालेली शासनाची मदत या बद्दलची माहीती देण्यात आली . तसेच ज्यांचेकडे नवीन नवीन कल्पना आहेत त्यांच्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यसत्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असुन यांत जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभाग घेणा-यांना आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून प्रथम , व्दितीय व तृतिय पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार , १५ हजार व १० हजार रु . रोख व सन्मानपत्र मिळणार आहे . तर राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होणा-या प्रथम पारितोषिक विजेत्यास प्रत्येकी रु . १ लाख व व्दितीय पारितोषिक विजेत्यास रु . ७५ हजार पुरस्कार स्वरूपात मिळणार आहे . तसेच पुढील कारकिर्दीसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे . सहभाग घेण्यास इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या www.mahastartupyatra.in व www.msins.in या वेब साईट वर जाऊन नाव नोंदणी करावी असे आवाहान संयोजकांनी केले आहे . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झेविअर आयटीआय श्रीरामपुरचे श्री . सांगळे सर , श्री . बो - हाडे सर , श्री रणदिवे सर , श्री . वराळे सर , श्री साळवे सर , श्री दिवे सर श्री . कुंजिर सर व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी परीश्रम घेतले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . सुनिल साळवे सर यांनी केले सर्वांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता झाली .