शेवगाव नगर परिषदेला नालेसफाईचा विसर. प्रशासनअंधारात:- शहरातील गटारे तुंबली
शेवगाव :- कचऱ्यामुळे जागोजागी तुंबलेल्या गटारांमुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे ावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे नगरपरिषदेच्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील कचरा संकलनाचा ठेका संपल्यानंतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्या मार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांचा आवमेळ घंटागाडी च्या अनियमिततेमुळे रस्त्यावर चौकात रहिवासी भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत हा कचरा वाऱ्यामुळे उघड्या गट मध्ये जाऊन ती तुंबली आहेत अनेक व्यवसायिक दैनंदिन साफसफाई नंतर कचरा थेट नाल्यांमध्ये टाकतात बाजार समिती व्यापारी संकुलाच्या समोरील बाजूचे गटार नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारे नेवासा रस्त्यावरील दोन्ही बाजूची गटारे पैठण रस्ता ते नित्यसेवा कॉर्नर भारदे विद्यालया समोरील गटार . मुख्य बाजारपेठेतील गटारे तुंबली आहेत शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध नसल्याने भूमिगत व उघडी गटारे तुंबतात त्याचा परिणाम परिसरात दुर्गंधी रोग राई पसरल्यावर होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या गटारात असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी जलवाहिन्या मध्ये जाते पावसाळा. जवळ आल्याने नगरपरिषदेने कचऱ्याचे ढीग उचलून नालेसफाईची राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील नाल्याचे पाणी घरात व दुकानात घुसते त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांचे नुकसान होत आहे यंदा देखील अशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी नाले सफाई करून तुंबलेली गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची गरज आहे
.:-सुनील डाखुरकर नागरिक खंडोबा नगर शेवगाव