शनिशिंगणापूर हायवे लगत, उंबरे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट.
उंबरे गाव मध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाचा वरदहस्त लाभल्यामुळे अवैध धंदयावाले चांगलेच जोमात आहेत.
गुटखा, गावठी दारू, विनापरवाना छोट्या-छोट्या हॉटेलमधून देशी -विदेशी दारू व्यवसाय मोठ्या जोमात चालू आहे.
या गोष्टीमुळे स्थानिक ग्रामस्थांची मोठी डोकेदुखी झाली आहे. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सूचना करूनही याबद्दल कुठलीही कारवाई केली जात नाही ही मोठी शोकांतिका आहे.
लिंबू सरबता सारखी खुलेआम दारू विक्री उंबरे गाव मध्ये चालू असल्याचा प्रकार समोर असतानाही कुठलीही कारवाई होत नाही याबद्दल कुतूहल वाटत आहे.
उंबरे गावातून जाणारा शनिशिंगणापूर हायवे असल्याकारणाने अनेक छोटया-मोठया हॉटेलांचे वास्तव्य या परिसरात आहे व जवळजवळ सत्तर टक्के हॉटेल व्यवसायांच्या माध्यमातून ही अवैध स्वरूपाची दारू विक्री केली जाते.
तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.