*डीपी वर काम करत असताना वीज कर्मचारी निलेश होनराव यांचा मृत्यू*
Delhi-91 bps live news
जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे (बार्शी)
मालवंडी (ता.बार्शी)
बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे डीपीला शॉक लागून अतिशय दुर्दैवी घटना.
डीपीवर काम करत असताना मालवंडी शिवारात विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी डीपीवर चढला असता शॉक लागलेल्या लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन च्या सुमारास दिसून आली. निलेश रामभाऊ होनराव (वय26) अशा या वीज कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
तो आउट सोर्सिंग (कंत्राटी कामगार) म्हणून कार्यरत होता. मालवंडी गावासह त्या परिसरातील सर्व विजेचे काम तो करत होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गुरुवारी मालवंडीच्या पश्चिमेला पाटील-म्हेत्रे यांच्या शेतातील असलेल्या रोहित्रावर चढलेला होता त्याच दरम्यान विद्युत प्रवाह सुरू झाला व एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मालवंडी येथे कुठलेही कुणाचेही काम असल्यास तो अत्यंत निर्मळ मनाने कार्य करत होता. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली संपूर्ण गावात शोकोकळा पसरली त्याची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. गावातील लोकांचे म्हणणे आहे की तो परमिट शिवाय काम करत नव्हता पण महावितरणचे अधिकारी भाग्यवंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ह्या कामासाठी त्याने परमिट घेतलीली नव्हती तालुका पोलीस स्टेशनचे डूकळे व इतर पोलीस व नागरिकांच्या साह्याने मृतदेह खाली उतरून घेऊन पंचनामा केला निलेशच्या पश्चात आई वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.