जनशक्ती विकास आघाडी वाघोली च्या वतीने वडुले खुर्द येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ

जनशक्ती विकास आघाडी वाघोली च्या वतीने वडुले खुर्द येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ

जनशक्ती विकास आघाडी वाघोली च्या वतीने वडुले खुर्द येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्याचा सत्कार समारंभ.

यशवंत पाटेकर 

जिल्हा प्रतिनिधी,

अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या राजकीय दृष्ट्या असणाऱ्या वडूले खुर्द या गावच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल जनशक्ती विकास आघाडी वाघोलीच्या वतीने वडूले खुर्द येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वाघोलीचे मा.सरपंच सुधाकर आल्हाट यांनी एकजुटीने व सूक्ष्म नियोजन, मान अपमान व अहंकार बाजूला ठेवून विजय कसा खेचून आणता येतो हे वडुले खुर्द येथील चैतन्य कानिफनाथ निस्वार्थ ग्रामविकास मंडळाकडून आदर्श रुपी समजून घेण्यासारखे आहे.यावेळी नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच भाऊसाहेब आव्हाड यांचे औक्षण करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे सहकारी सदस्य तात्या भाऊ तुतारे,सोपान रणमले,कानिफनाथ आव्हाड,रामदास पांढरे,रावसाहेब पाखरे,यांचाही सत्कार करण्यात आला तसेच या निवडणुकीत किंगमेकर म्हणून ज्यांनी आपली भूमिका निभावली असे दिलीप आव्हाड,रमेश आव्हाड,रूस्तुम आव्हाड,गोकुळ नागरे यांचाही सत्कार करण्यात आला.

 सत्कारला उत्तर देताना सरपंच भाऊसाहेब आव्हाड म्हणाले गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्य कटिबद्ध आहोत.गावातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन आम्ही गावाचा विकास साधण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत.आपण केलेल्या सत्काराबद्दल आपले मनापासून आभार मानतो.दत्तकृपा कृषी प्रोडूसर कंपनीचे संचालक अशोक दातीर सर यांनीही नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी सुधाकर आल्हाट,भिमराज शिंदे, बाळकृष्ण शिंदे,रतन आल्हाट,पांडुरंग दातीर,रंगनाथ जमधडे, मोतीराम काळे,महेश दातीर,अमोल भालसिंग,श्रीधर शिंदे,अर्जुन शिंदे, भगवान आल्हाट,दीपक शिंदे, ज्ञानेश्वर कळकुटे,गोरक्ष शिंदे, हिरामण आल्हाट,राजेंद्र आल्हाट, किशोर आल्हाट हे मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश दातीर यांनी केले व अमोल भालसिंग यांनी आभार मानले.