मंत्रिमंडळात विस्तारात आमदार मोनिकाताई राजीव राजाळे यांना संधी द्या- नारायण मडके

*मंत्रिमंडळ विस्तारात आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांना संधी द्या- नारायण मडके
शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर
शेवगाव :सध्या महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून सरकारचा लवकर पुढील काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ अद्यापही अनेक दिवसापासून मंत्रीपदापासून वंचित आहे तरीही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अरे सम्राट लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांना महत्त्वाचे मंत्रिपद देऊन मंत्रिमंडळ विस्तारात संधी द्यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष व गदेवाडी ग्रामपंचायत सदस्य नारायण कल्याणराव मडके यांनी केली आहे.पुढे बोलताना श्री मडके म्हणाले लवकरच शिंदे व फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांना महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्रीपदी संधी द्यावी. त्या अनुषंगाने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक कामे आखणी मोठ्या प्रमाणात होऊन शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा विकास साधता येईल.आणि यांचा फायदा दखील महाराष्ट्र राज्याला निश्चितच होईल. अशी अपेक्षा भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नारायण मडके, कुदुस पठाण,गोरक्ष काटे, शिवप्रसाद भराट, सोमनाथ मडके,आकाश हाडे,संजय वडघने,भारत मडके,दिपक काकडे, यांच्यासह आदि कार्यकर्त्यांनी अशा व्यक्त केली.