*पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडून बार्शी पोलीस जाणीव सेवा संघ टीम "कार्य गौरव पुरस्काराने" सन्मानित*

*पोलीस  जाणीव  सेवा  संघ  महाराष्ट्र  राज्य  कडून  बार्शी  पोलीस  जाणीव  सेवा  संघ  टीम  "कार्य  गौरव  पुरस्काराने"  सन्मानित*

बी.पी.एस.राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

 बार्शी(ता.बार्शी).       दि.24-07-2022 रोजी  बार्शी शहर येथे पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पोलीस सेवा संघ बार्शी टीमला "कार्य गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

हा कार्य गौरव पुरस्कार बार्शी येथे पोलीस बांधवांना वेळोवेळी त्यांच्यासोबत आषाढी वारी असो किंवा गजानन महाराज पालखी व अन्य गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त केल्यामुळे हा पुरस्कार बार्शीतील सर्व पदाधिकारी, सदस्य व महिला वर्ग टीमला देण्यात आला. हा पुरस्कार बार्शी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच या पुरस्काराबरोबर नवनिर्वाचित नियुक्तीपत्रे ही देण्यात आली.

त्याचबरोबर पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडून API इज्जपवार साहेब व PSI प्रवीण सिरसाट यांना बार्शी शहर येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक इज्जपवार साहेब व उप-निरीक्षक सिरसाट साहेब यांनी पोलीस जाणीव सेवा संघाचे मागील दोन ते तीन वर्षाचे सेवा कार्य पाहून संघाचे तोंड भरून कौतुक करून अभिनंदन केले. साहेब म्हणाले की बार्शी संघटनेचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आहे निश्चितच ह्या टीमचा फायदा बार्शी शहर पोलीस दलाला झाला आहे व यापुढेही होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आणि पोलीस जाणीव सेवा संघाला आमची सदैव साथ आहे असेही ते म्हणाले. तसेच पोलीस जाणीव सेवा संघाच्या बार्शी पदाधिकारी व सदस्य यांनी साहेबांना असे आश्वासन दिले की, कसल्या प्रकारची गरज भासल्यास आम्ही आपल्या कार्यास तत्पर राहू.

यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे विभाग प्रमुख- उमेश आणेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, कार्याध्यक्ष- संतोष दराडे, बार्शी शहराध्यक्ष- अभिजीत माळी, उपाध्यक्ष- विजय माळी, तालुका सहसचिव- राजगोपाल मालू, तालुका संघटक- शिवलिंग बुके, प्रमुख सदस्य- उमेश पंडित, दत्ता माने, संतोष घोंगाने, रमेश कानडे, सागर काशीद, अमोल चिंधे, आकाश फोपटे, बालाजी काळे.

तसेच,  महिला बार्शी तालुका अध्यक्ष- सुप्रिया काशीद, संपर्कप्रमुख- रूपाली विधाते, उपसंपर्कप्रमुख- अमृता आणेराव,  कार्याध्यक्ष- शारदा मोहिते, सहसचिव- सुनीता मस्के, सहकार्य अध्यक्ष- सारिका आणेराव, संघटक- मीनाक्षी कानडे, बार्शी शहर अध्यक्ष- मनीषा साळुंखे, उपाध्यक्ष- कौशल्य राऊत, संपर्कप्रमुख- मनीषा लोकरे, बळेवाडी महिला अध्यक्ष- वर्षा तरटे, संघटक- पूजा सातारकर, सह संघटक- भाग्यश्री बोंडवे, प्रमुख सदस्य- राधा घोंगाने, नीता काजळे, सीमा तांबारे, जयदेवि काकडे, पौर्णिमा काकडे आदी उपस्थित होते.