भीषण अपघातात पती-पत्नी सह भाच्याचा मृत्यू..

बी पी एस लाईव्ह न्युज...!!
काटोल/नरखेड- वेगात जाणाऱ्या बोलरोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर सायकल ला जोरात धडक दिली. त्यात दुचाकी वरील पती, पत्नी व भाचा या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हि घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरखेड-सावरगाव मार्गावरील जुनोना (फुके) शिवारात असलेल्या वळणावर रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.
मृतांमध्ये रोशन नंदराम मुंगभाते वय २५ ,रा. मन्नातखेडी ,रा.नरखेड , रामचंद्र महादेव नेहारे वय ४५ ,व रंजना रामचंद्र नेहारे वय ४२ , दोघेही रा. वाजबोडी ता.काटोल या तिघांचा समावेश आहे. तिघेही हिवरा (जिल्हा छिंदवाडा , मध्यप्रदेश) येथुन लग्न आटोपून एम एच - ४०/बी एच-४१७३ क्रमांकाच्या मोटरसायकल ने गावाला परत येत होते.
ते जुनोना (फुके) शिवारातील वळणावर येताच सावरगावाहून नरखेड च्या दिशेने वेगात जाणाऱ्या बोलरोने त्यांच्या मोटरसायकल ला जोरात धडक दिली यात गंभीर दुखापत झाल्याने तिघांचा ही घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी नरखेड पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे..!!