शेवगाव मार्केट कमिटी बाजार समिती संचालक मंडळ निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. नरेंद्र घुले यांची विरोधकांवर चौफर टीका.

शेवगाव मार्केट कमिटी बाजार समिती संचालक मंडळ निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. नरेंद्र घुले यांची विरोधकांवर चौफर टीका.

शेवगांव मार्केट कमिटी बाजारसमिती संचालकमंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र घुले यांची विरोधकावर चौफेर टीका.

शेवगाव प्रतिनिधी :- यशवंत पाटेकर.

शुभम मंगलकार्यालय आखेगांव रोड येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार यांनी तालुका प्रतिनिधी आणि त्यांच्या ढिसाळ कारभारावर चौफेर टीका केली गेल्या आठ वर्षात शेवगांव तालुक्याला बस स्थानक सुद्धा करता आले नाही बाकीच्या तालुक्यात विमानतळ होण्याच्या गप्पा आमदार आणि खासदार मारत आहेत शेवगांव मराठवाड्याचे प्रवेशद्वार असुन सुद्धा शेवगांव बस स्थानकाला नावाचा बोर्ड सुद्धा नाही बाहेरच्या प्रवाश्याना शेवगांव आले कधी आणि गेले कधी हे सुद्धा कळत नाही ज्यांच्या कारकिर्दीत फौजदाराचे कपडे चोरीला जाण्याचे गुन्हे घडतात तर सर्वसामान्यांची कायदा आणि सुव्यवस्था कोण ठेवणार ताजनापूर लिफ्ट चा टप्पा क्रमांक दोन पुर्ण होऊन शेवगांव तलुजच्या पुर्व भागाला पाणी मिळणे अपेक्षित होतें पण तसे न होता शेजारच्या गेवराईच्या आमदारांनी तुमच्या नाकावर टीचुन गेवराईला पाणी नेले शेवगावकरांना स्वतःच्या सुपीक जमिनी पाण्याखाली जाऊनही दर पंधरा दिवसाला पाणी किती दिवस लोकाना भावनिक करून मतांचा जोगवा मागुन विकासापासून तालुका वंचीत ठेवणार??? तालुक्यातील एकाही राज्य महामार्ग आणि तालुक्यातील खेड्यापाड्याला जोडणारे अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे तालुज्याचे आमदार हजरो कोटी ऋवयांची कामे मंजूर झाल्याचा दावा करतात मग बोधेगाव शेवगांव आणि तालुज्यातील मोठं मोठ्या बाजारपेठांतील दुकानांमध्ये रोज फुफाटा माती कुठुन येते ??? असा सवाल केला वोरोधकांना मार्केटकमिटीचा फॉर्म भरताना सूचक आणि अनुमोदक सुद्धा मिळु देऊ नका नाहीतर काळ तुम्हाला माफ करणार नाही उमेदवार न पाहता चिन्ह पाहुन मतदान करा तालुक्यातील निविदा पाणी उपसा योजना आणि शेतकऱ्यांना सोलर मोटार पंप देऊन वीजबिलाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू ट्रान्सफार्मर जळला तर शेतकऱ्यांना थेट कैडगावाला अधिकाऱ्याच्या पाया पडायला जावे लागते आणि तिथे चरिमिरी देऊन तो ट्रान्सफार्मर मिळतो तो पर्यंत पिके माना टाकतात शेतकऱ्यांनी हा फरक ओळखून निर्णय घ्यायला हवा कार्यक्रमाला माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह शेवगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हा. चेअरमन मार्केट कमिटीचे आजी माजी संचालक शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतें 

पत्रकार :-यशवंत पाटेकर