शालेय राष्ट्रीय खेळात कामगिरी ला भू वि व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी महाराष्ट्र क्रीडा शिक्षक सुधीर बूटे पत्रकार हस्ते सत्कार
शालेय राष्ट्रीय खेळात कामगिरी
ला भू वि व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी येथील खेळाडूची राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार राहिली आहे. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधीर बुटे यांची 1994 ला नियुक्ती झाली. तेव्हा पासून सलग 27 वर्षाचे सेवेत सुमारे 2हजारावर खेळाडू शालेय राज्य तर शंभरवर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे. फेडरेशन स्पर्धेत सुमारे 125 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळले आहे.त्यांचे मार्गदर्शनात विद्यालयात हँडबॉल, रस्सीखेच, डॉजबॉल, थ्रोबॉल, शूटिंग व्हॉलीबॉल, आर्चरी, गोलाफेक आदी खेळांचे प्रशिक्षण लाभले. विविध खेळात महाराष्ट्रात 12 वेळा राज्य चॅम्पियन शिप, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे संघाचे बरेचदा नेतृत्व त्यांचे खेळाडूने केले असून 1997 शालेय दिल्ली राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ प्रशिक्षक, तर 2006 त्रिपुरा शालेय राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत प्रशिक्षक भूमिका पार पाडली. राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मिडल मिळविण्याची संधी विद्यालयाचे खेळाडूंना मिळाली असून अनेक खेळाडुंना नोकरी मिळण्यास संधी मिळाली आहे. बुटे यांना स्वर्गीय गजाननराव मोटघरे, रघुनाथ पडोळे, पुरुषोत्तम धांडे, गजानन पिसे, हरीश राठी, उज्वल मोटघरे, तत्कालीन आजी सर्व प्राचार्य , शिक्षक वृंद तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ श्याम सुंदरजी लद्धड, मधुसूदनजी राठी, राहुलजी लद्धड यांचे विशेष प्रेरणा आदी सह मित्रमंडळी, पालक वर्गाचे सहकार्य लाभल्यामुळे मला यश मिळविता आलेचे प्रतिक्रिया राज्य क्रीडा पुरस्कर्ते सुधीर बुटे यांनी दिल्या.