आखतवाडे येथून शेतातून 113 किलो वजनाची 129 गांजाचे झाडे मुद्देमाला सह जप्त व एकासअटक शेवगाव पोलिसांची कारवाई

आखतवाडे येथून शेतातून 113 किलो वजनाची 129 गांजाचे झाडे मुद्देमाला सह जप्त व एकासअटक शेवगाव पोलिसांची कारवाई

शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकरी अरुण बाजीराव आठरे (वय वर्ष .44. रा .बोरलवण वस्ती आखतवाडे ता. शेवगाव) याने आपल्या मोसंबीच्या भागांमध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांना कळाली या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचा समक्ष छापा टाकून अरुण बाजीराव आठरे यांच्या शेतातून तब्बल पाच लाख 65 हजार रुपये किमतीचा 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी अरुण बाजीराव आठरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती कळाली की आखदवाडे येथील बोरलवान वस्ती येथील एका शेतकऱ्याने शेतातील मोसंबीच्या बागेमध्ये गांजाची झाडाची शेती केली आहे या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी कोणी विलास पुजारी सपोनि विश्वास पावरा सपोनी आशिष शेळके पोहेकँ परशुराम नाकाडे चापोहेकाँ बडे पोना उमेश गायकवाड पोना सुजित सरोदे, पोकाँ सुनील रत्नपारखी पोकाँ सचिन खेडकर पोकाँ एकनाथ गरकळ पोकाँ वैभव काळे मपोकाँ रूपाली कलोर यांचे पथक तयार करून पांचाळ समक्ष सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर तहसीलदार राहुल गुरव वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी यांच्यासह दोन शासकीय पंच फोटोग्राफर यांच्यासोबत घेऊन सदर माहितीतील शेतकरी (अरुण बाजीराव आठरे रा.बोरलवण वस्ती आखतवाडे) या शेतकऱ्याच्या गट नंबर 156 मध्ये असलेल्या मोसंबीच्या बागेमध्ये गांजाची झाडे आढळून आली.

यावेळी सदरील शेतकरी अरुण आठरे याला ही शेती कोणाची आहे असे विचारले असता त्यांनी ही माझी मालकीची असून सदर गांजा मी पिकवीत असल्याचे सांगितले यावर त्याची झेडपी घेण्याबाबत विचारले असता त्यांनी झेडपीस नकार दिला त्यावेळी पोनि. विलास पुजारी यांनी एन डी पी एस कायदा कलम 50 (1) प्रमाणे अरुण आठे या समाज पत्र देऊन झेडपी घेतली यावेळी मोसंबीच्या बागेमध्ये तब्बल 129 गांजाची झाडे आढळून आली या झाडाचे वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी यांच्या समक्ष इलेक्ट्रिक काट्यावर वजन केले असता ते 113 किलो भरले पोलिसांनी गांजाच्या झाडाच्या मुळाची माती व शेतातील साधी माती यांच्यासह पाच लाख 65 हजार रुपये किमतीची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी पोहे का परशुराम नाकाडे यांच्या फिर्यादीवरून शेतकरी अरुण बाजीराव आठरे (वय. 44.रा. बोरलवण आखतवाडे ता. शेवगाव) याला मुद्देमाला सह ताब्यात घेऊन त्याच्यावर शासनाने बंदी घातलेल्या गांजाच्या झाडाची बेकायदेशीर रित्या लागवड करून वाढवलेल्या स्थितीत मिळून आल्याने एन डी पी एस कायदा सन 1985 चे कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.