बार्शी तालुका पंचायत समितीमधील उप-अभियंतां यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडले.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी,
बार्शी.(ता.बार्शी) बार्शी तालुका पंचायतीमधील उपअभियंत्यास 2000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी अटक झालेल्या उप-अभियंत्याचे नाव आयुब शेख असे आहे. अधिक माहिती अशी आहे की मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कॉन्ट्रॅक्टदार यांच्या तक्रारीवरून बार्शी तालुक्यामधील बुधवारी नारेवाडी या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजने मधून काम केले होते तेव्हा त्यांनी उप-अभियंता शेख यांना बिल काढण्यास सांगितले असता त्यांनी पुढील व्यक्तीस 2000 रुपयाची लाचेची मागणी केली.