बालदिवस निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बालदिवस निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रतिनिधी - वाहिद शेख
सावनेर : १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. जगभरात इतर देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला हा दिवसा साजरा करण्यात येतो. केवळ भारतातमध्येच बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो.
त्या अनुषंगाने सावनेर शहरातील जवाहरलाल नेहरू शाळा येथे शाळेतील विद्यार्थांना बालदिना निमित्त कैलाश साथ्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन व महिमा बहुउदेशिया सामाजिक संस्था द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका , शिक्षक व इतर कर्मचारीवृंद उपस्थित होते .
तसेच कैलाश साथ्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन व महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्यावतीने जवाहरलाल नेहरू शाळा व भालेराव शाळेच्या विद्यार्थ्यांना बालदिना निमित्त बालहक्क परिषदच्या आयोजन पोलीस स्टेशन सावनेर येथे करण्यात आला.
पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या नेतृत्वाखाली बाल संरक्षण अधिकारी श्री मुश्ताक पठाण यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क कायदा विषयी संबोधित करून मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मुळक , जिल्हा परिषद अधिकारी श्री प्रसन्नजित गायकवाड , सौ. शीतल पाटील (अध्यक्ष) महिमा बहुउदेशिया सामाजिक संस्था व कैलाश साथ्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन नागपूर जिल्हा व संस्थेचे पदाधिकारी वर्षा पाटील , राणी कळमकर व शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षिका इत्यादि उपस्थित होते .