*प्रार्थमिक आरोग्य केंद्र कचारीसावंगा येथे जागतिक महिला दिन साजरा*

*प्रार्थमिक आरोग्य केंद्र कचारीसावंगा येथे जागतिक महिला दिन साजरा*

काटोल :- प्राथमीक आरोग्य केंद्र कचारीसांवगा येथे जागतिक महिला दिनाचे निमित्ताने मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता स्तनदा माता तसेच  0 ते 2 वर्ष वयोगटातील लाभार्थी यांची डॉ.कळसाईत  साहेब बालरोग तज्ज्ञ, डॉ.दिनेश डवरे स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे मार्फत  आरोग्य तपासणी करण्यात आली.गरोदर मातेच्या रक्त व ईतर आवश्यक तपासणी  या वेळी करण्यात आला. जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रसंगी गरोदर माता व स्तंनदा माता बरोबरच महिला डॉ.कांदबरी ऊंबरहांडे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केद्र कचारीसांवगा व ईतर महिला डॉक्टर, सर्व महिला,सी एच ओ.आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवीका यांचा सुध्दा मनोबल वाढवण्यासाठी सर्व पुरूष आरोग्य कर्मचारी  कर्मचारी मित्र परिवार मार्फत सत्कार करण्यात आला.या वेळी मा.डॉ.कादबरी ऊंबरहांडे , डॉ.वर्षा बोरकर, डॉ.समीर ढवळे, सुभाष कावटे तालुका पर्यवेक्षक ,प्रशांत वीरखरे आरोग्य नीरीक्षक ,सौ.पुजा चिकराम आरोग्य सहाय्यक यांचे उपस्थित करण्यात आला. या वेळी श्री.केद्रे ,हेमंत गोंडाने,वैभव चरपे,श्री.धोटे,श्री.वनवे,सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.