सावनेर येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कथा शांततापूर्वक पार पाडण्यात आले .

सावनेर येथे  श्रीमद  भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कथा शांततापूर्वक  पार  पाडण्यात  आले .

सावनेर येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कथा शांततापूर्वक पार पाडण्यात आले .

 प्रतिनिधी - वाहिद शेख , नागपूर 

 सावनेर : भागवत कथा म्हणजे भगवंताची कथा, पण भक्तांच्या कथेशिवाय भगवंताची कथा अपूर्ण आहे.

 म्हणूनच प्रत्येक शास्त्रात, पुराणात देवाच्या कथेसोबतच भक्तांची कथाही येते.

 नवधा भक्तीमध्ये पहिली भक्ती म्हणजे श्रवण.

 आपण आपल्या कानांनी जे ऐकतो ते आपल्या हृदयात प्रवेश करतो आणि नंतर आपण तेच बोलतो.

 कथा ऐकली तर तोंडातून फक्त कथाच निघेल.

 श्रीमद भागवत कथा श्रवण करणे आणि पाठ करणे या दोन्ही गोष्टी आत्म्याला मुक्ती देतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. भागवत पुराणाला मुक्तीचा ग्रंथ म्हटले गेले आहे, म्हणून प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी त्याचे आयोजन केले पाहिजे.

याशिवाय रोग-शोक, कौटुंबिक विघ्न दूर करणे, आर्थिक समृद्धी आणि आनंदासाठी हे आयोजन केले जाते.

त्यानिमित्त 15 नोव्हेंबर रोजी श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कथाचे आयोजन सावनेर येथील भगवान उपासराव लाड यांच्याद्वारे वार्ड नं 11 मीनाक्षी टॉकीजच्या मागे माता मंदिर जवळ करण्यात आले .

कथाकार पंडित किशोरजी (मुन्ना) महाराज पालीवाल यांच्या मधुर भाषणाने कथेत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कथाकार परमपूज्य किशोरजी (मुन्ना) महाराज पालीवाल यांनी कथेचा प्रसार करताना सांगितले की, केवळ श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात.

स्व.युवराज भगवानजी लाड यांच्या स्मरणार्थ या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कथाचे आयोजन करण्यात आले होते .

 परमपूज्य किशोरीजी महाराज पालीवाल यांनी श्रीमद भागवत कथेच्या व्यासपीठावर बसून आपल्या मधुर भाषणाने भक्तांना भागवत कथेच्या ज्ञानाने मंत्रमुग्ध केले.

विशेष म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ झाला.

पंडित किशोरजी महाराज पालीवाल यांनी उपस्थित भाविकांना सांगितले की, मन:शांती हवी असेल, तर त्यांनी आपले कर्तव्य नेहमी शुद्ध मनाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 कथेला सावनेर नगरातील शेकडो भाविकांसोबत इतर शहरातील व आजूबाजूच्या गावातील भाविकही उपस्थित होते. भगवानजी लाड परिवार तर्फे र्श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यामुळे कुणाल लाड , प्रमोद सुरजूसे , कुणाल बनसोड सोबत सर्व सावनेर शहरातील आवड असणाऱ्या भाविकांनी या श्रीमद भागवत कथेचा आस्वाद घेतला. तसेच 21 नोव्हेंबर रोजी श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा समापन शांततेने पार पाडण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पारवे , पूर्व नगरसेवक आशिष मानकर सोबत स्थानिक नागरिक यांनी कथावाचक पंडित किशोरजी (मुन्ना) महाराज पालीवाल यांचा सत्कार करून त्यांचे अभिवादन केले .